-->

जिल्हास्तरीय लोकशाही दिन ७ सप्टेंबर रोजी

जिल्हास्तरीय लोकशाही दिन ७ सप्टेंबर रोजी



साप्ताहिक सागर आदित्य 

 जिल्हास्तरीय लोकशाही दिन ७ सप्टेंबर रोजी


सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या शासन परिपत्रकानुसार दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते.


 त्या अनुषंगाने जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी  कार्यालयातील राजे वाकाटक सभागृहात करण्यात येणार आहे.


या लोकशाही दिनामध्ये सामान्य नागरिकांनी त्यांच्या तक्रारी/निवेदने (तालुका, जिल्हा  लोकशाही दिनामध्ये यापूर्वी सादर केलेल्या प्रकरणांनंतर) विहीत नमुन्यात आवश्यक कागदपत्रांसह लोकशाही दिनाच्या किमान १५ दिवस आधी दोन प्रतींमध्ये सादर करणे आवश्यक आहे. या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत व प्रभावी निराकरण व्हावे, यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी या जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

0 Response to "जिल्हास्तरीय लोकशाही दिन ७ सप्टेंबर रोजी"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article