अकोला नाका ते काटा चौक मार्गावरील वाहतूक वळवली नागरिकांनी पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन
साप्ताहिक सागर आदित्य
अकोला नाका ते काटा चौक मार्गावरील वाहतूक वळवली
नागरिकांनी पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन
वाशिम, वाशिम शहरातील अकोला नाका ते काटा चौक या मार्गावरील सुमारे १.२ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे बांधकाम सुरू असल्याने या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक ४ सप्टेंबरपासून पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. नागरिकांनी पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
जिल्हा दंडाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ३३ (१) (ख) अन्वये याबाबतचे आदेश जारी केले आहेत. अकोला नाका ते काटा चौक या मार्गावरील वाहतूक जिल्हा शासकीय रुग्णालय, आरटीओ कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, आर.ए. कॉलेज व परिसरातील इतर शासकीय कार्यालयांच्या मार्गाने वळविण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गाचा वापर करणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
*काटा, कोंडाळा व ग्रामीण भागासाठी पर्यायी मार्ग*
काटा, कोंडाळा तसेच संबंधित ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या वाहनांसाठी अकोला नाका ते अकोला रोड, वाटाणे लॉन, पाटील धाबा, काटा-कोंडाळा रोडमार्गे काटा, कोंडाळा व संबंधित ग्रामीण भागाकडे जाण्याचा पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. या मार्गाचा वापर करून वाहनचालक प्रस्तावित नो-एंट्री टाळून पुढे जाऊ शकतील.
*दुचाकी वाहनांसाठी काटा चौक ते अकोला नाका वन-वे*
काटा चौक ते अकोला नाका या मार्गावर केवळ दुचाकी वाहनांसाठी एकेरी वाहतूक सुरू राहणार आहे.
दरम्यान, अत्यावश्यक सेवांमध्ये रुग्णवाहिका, अग्निशमन वाहने, पोलीस वाहने, शासकीय अत्यावश्यक सेवेतील वाहने तसेच आपत्कालीन परिस्थितीतील इतर अधिकृत वाहनांना परिस्थितीनुसार या निर्बंधातून आवश्यक ती सूट देण्यात आली आहे.
0 Response to "अकोला नाका ते काटा चौक मार्गावरील वाहतूक वळवली नागरिकांनी पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन"
Post a Comment