-->

बंजारा तीज उत्सवानिमित्त वसंतराव नाईक विद्यालयात पारंपरिक गीत-नृत्याचे सादरीकरण

बंजारा तीज उत्सवानिमित्त वसंतराव नाईक विद्यालयात पारंपरिक गीत-नृत्याचे सादरीकरण



साप्ताहिक सागर आदित्य 

बंजारा तीज उत्सवानिमित्त वसंतराव नाईक विद्यालयात पारंपरिक गीत-नृत्याचे सादरीकरण

मानोरा : बंजारा समाजाच्या समृद्ध संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने बंजारा तीज उत्सवानिमित्त वसंतराव नाईक विद्यालय, मानोरा येथे आज विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

यावेळी शाळेतील विद्यार्थिनींनी पारंपरिक बंजारा वेशभूषेत सहभागी होत तीज गीतांचे गायन व पारंपरिक नृत्य सादर केले. विद्यार्थिनींच्या मनमोहक गीत-नृत्याने शालेय परिसरात उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक  भगत सर यांनी बंजारा समाजातील तीज (ज्वारा) उत्सवाचे महत्त्व, त्यामागील सांस्कृतिक परंपरा तसेच या उत्सवातून मिळणारा सामाजिक व पर्यावरणपूरक संदेश याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांना आपल्या पारंपरिक संस्कृतीची ओळख व्हावी, लोककला व लोकपरंपरांचे महत्त्व समजावे आणि आपल्या सांस्कृतिक वारशाबद्दल अभिमान निर्माण व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला.

विद्यार्थिनींनी सादर केलेल्या पारंपरिक गीत-नृत्याचे उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांनी कौतुक केले.

0 Response to "बंजारा तीज उत्सवानिमित्त वसंतराव नाईक विद्यालयात पारंपरिक गीत-नृत्याचे सादरीकरण"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article