भारत प्राथमिक मराठी शाळा रिसोड येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा..,
साप्ताहिक सागर आदित्य
भारत प्राथमिक मराठी शाळा रिसोड येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा..,
रिसोड : भारत प्राथमिक मराठी शाळा, रिसोड येथे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती व परंपरांची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने तान्हा पोळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी आकर्षक पद्धतीने सजविलेल्या बैलांच्या प्रतिकृती घेऊन कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका आ. सौ. किरणताई दुबे मॅडम ह्या होत्या. कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या आदरणीय.सौ. ज्योती दुबे मॅडम,
खाडे सर, कु.भांदुर्गे मॅडम व कु.जुमडे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.
तान्हा पोळ्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शेतकरी, बैल व शेतीशी असलेले नाते तसेच आपल्या पारंपरिक सणांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्याने शाळेतील वातावरण आनंदमय झाले होते.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन गजानन डोंगरे सर यांनी केले. आभार प्रदर्शन राहुल मोरे सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये परिश्रम घेतले. व कार्यक्रम यशस्वी पार पाडला.
0 Response to "भारत प्राथमिक मराठी शाळा रिसोड येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा..,"
Post a Comment