-->

माजी खासदार  अनंतराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत क्रीडा स्पर्धा संपन्न

माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत क्रीडा स्पर्धा संपन्न



 साप्ताहिक सागर आदित्य 

माजी खासदार  अनंतराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत क्रीडा स्पर्धा संपन्न

रिसोड : दि आर्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तसेच माजी मंत्री व खासदार सर्व सामान्य जनतेचे लाडके लोकनेते, आदरणीय  अनंतराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेमध्ये १९ ऑगस्ट २०२६ बुधवारला विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये वर्ग ५वी ते १२वी मधील विद्यार्थ्यांसाठी धावण्याची शर्यत,स्लो सायकल तसेच विद्यार्थीनींसाठी रांगोळी व संगीत खुर्ची या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये बहुसंख्य विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.अत्यंत उत्साहाच्या वातावरणात या सर्व स्पर्धा पार पडल्या. यानंतर प्रत्येक स्पर्धेमध्ये प्राविण्य मिळवलेल्या प्रथम तीन विद्यार्थ्यांना मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. शाळेचे प्राचार्य  संजय भांडेकर, उपप्राचार्य  संजय शर्मा व पर्यवेक्षक  ज्ञानेश्वर थोरात तसेच शाळेचे ज्येष्ठ शिक्षक  हमाने सर व  काटे सर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे प्राचार्य  भांडेकर  सर यांनी   अनंतराव देशमुख यांना शाळेच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा व्यक्त केल्या व त्यांच्या दीर्घायुष्याबद्दल शुभकामना व्यक्त केल्या तसेच स्पर्धेमध्ये सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे संचलन व आभारप्रदर्शन  डी. एन. देशमुख सर यांनी केले.या वाढदिवसाच्या प्रसंगी वर्ग ५ ते १२ च्या सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी  शाळेचे सर्व प्राध्यापक,प्राध्यापिका, शिक्षक,शिक्षिका व सर्व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी परिश्रम घेतले.

0 Response to "माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत क्रीडा स्पर्धा संपन्न"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article