-->

भा.मा. कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी...

भा.मा. कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी...

 


साप्ताहिक सागर आदित्य 

भा.मा. कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी...

रिसोड तालुक्यातील एकमेव मुलींचे भारत माध्यमिक कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड येथे लोकशाहीर साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांची जयंती व नरकेसरी बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली या संयुक्त जयंती आणि पुण्यतिथी कार्यक्रमाच्या अध्यक्षा भारत  माध्यमिक कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या आदरणीय मंजुषा सु. देशमुख मॅडम या असुन प्रमुख अतिथी कन्या शाळेचे पर्यवेक्षक आदरणीय सुनील डहाळके सर हे होते. या मान्यवरांच्या हस्ते प्रथमतः लोकशाहीर आण्णाभाऊ साठे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक या महामानवाच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर विचार मंचावरील सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावित सन्माननीय जारे मॅडम यांनी केले. त्यानंतर विद्यार्थिनींनी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत भाषणे, पोवाडे, गीत गायन केले. तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या १०६ व्या पुण्यतिथीनिमित्त तथा पुण्यस्मरणा निमित्त आपला भाषणातून सखोल प्रकाश टाकला . त्यानंतर प्रमुख अतिथीमध्ये शाळेची पर्यवेक्षक आदरणीय सुनील डहाळके सर यांनी  महापुरुषांच्या जीवनावर भाष्य करताना लोकमान्य बाळ गंगाधर टिळक म्हणजे आदर्श नेता धैर्यवान, बुद्धिवान आणि स्वार्थत्यागी असावा लागतो. एकाच एका व्यक्तीच्या ठाई एवढी गुणवत्ता , गुणसंपदा आढळून शकेल का? बुद्धिमान व्यक्ती गतिमान असणे, गतिमान व्यक्ती धैर्यवान असणे आणि धैर्यवान व्यक्ती त्यागी असणे खरोखर शक्य आहे का? या प्रश्नांची उत्तरे इतिहासाला अडखळता देता यावीत यासाठी नियतीने काही माणसे जन्माला घातली असावीत. लोकमान्य अशा व्यक्तींपैकी एक होते. अशी भावस्पर्शी उद्गगार व्यक्त केले. त्यानंतर अध्यक्षीय समारोपपर विचारातून भारत कन्या कनिष्ठम हाविद्यालयाच्या प्राचार्या सन्माननीय मंजुषा सु. देशमुख मॅडम यांनी साहित्यरत्न साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णा भाऊं याच्या १०६ जयंतीनिमित्त  अण्णाभाऊंच जीवन म्हणजे संघर्षाची गाथा होय. त्यांनी मराठी साहित्याला खूप मोठी देन दिलेली आहे त्यामध्ये ३५ कादंबऱ्या, १५ कथासंग्रह, १५ नाटके १,वगनाट्य,१ प्रवास वर्णन. असे त्यांचे साहित्य जगातल्या २७ भाषेमध्ये भाषांतरित आहे. ती एक लोक आणि लेखक होते. ब्रिटिश राज्यकर्त्यांनी गुन्हेगार म्हणून शिका मारलेल्या जमातीत त्यांचा जन्म झाला. त्यांनी त्या जाती जमातीच्या व्यथा वेदना आपल्या साहित्यातून मांडल्या व त्याला वाचा फोडली. असे हृदयस्पर्शी उदगार आपल्या विचारातून व व्याख्यानातून व्यक्त केले. छोटी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. साधना बोरकर मॅडम यांनी केले व आभार प्रदर्शन राठोड मॅडम यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी यांनी मोलाचे सहकार्य केल.

0 Response to "भा.मा. कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी..."

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article