-->

न्यायालयीन कर्मचारी आंदोलनाच्या तयारीत.  राज्यातील 34 हजार कर्मचारी समान वेतनासाठी एकवटणार

न्यायालयीन कर्मचारी आंदोलनाच्या तयारीत. राज्यातील 34 हजार कर्मचारी समान वेतनासाठी एकवटणार

 


साप्ताहिक सागर आदित्य 

न्यायालयीन कर्मचारी आंदोलनाच्या तयारीत.

राज्यातील 34 हजार कर्मचारी समान वेतनासाठी एकवटणार


उच्च न्यायालयाप्रमाणेच दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांनाही वेतन मिळावे, या मागणीसाठी राज्यातील सर्व संघटना एल्गार पुकारणार आहेत. राज्यातील सुमारे 34 हजार कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचे हत्यार उपसले जाणार असल्याची माहिती येथील संघटनेचे प्रतिनिधी पंकज चव्हान यांनी दिली.


 मुंबई उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांना वेतन मिळते त्याच धर्तीवर समान वेतन दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांना मिळावे, या मागणीसाठी काही वर्षे प्रयत्न सुरू आहेत. कर्मचाऱ्यांकडून विनंती मागणी, निवेदन अशा पद्धतीने पाठपुरावा सुरू आहे. याबाबत उच्च न्यायालयाने राज्य शासनाला जानेवारी 2025 मध्ये अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, राज्य शासनाकडून हा अहवाल प्रलंबित आहे. वारंवार निवेदनाद्वारे माहिती देऊनही राज्य शासनाकडून दखल घेतली जात नाही. त्यामुळे न्यायालयातील कर्मचाऱ्यांच्या राज्यातील सर्व संघटनांनी एकत्रित येऊन आंदोलनाचा एल्गार करण्याचा निर्णय नुकताच मुंबईत घेतला आहे. याबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वाशिमचे पालकमंत्री दत्तामामा भरणे यांचीही भेट घेऊन निवेदन दिले. यामध्ये न्यायालयीन कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी रविंद्र पी सोनवणे, प्रशांत कारंजकर, दुर्गेश राठोड, जी पी राजेकर आणि पंकज चव्हाण यांचा समावेश होता. 

-------------------------------------

असे होईल आंदोलन

6 सप्टेंबर : काळ्या फिती लावून काम करणे

16 आणि 17 ऑक्टोबर: सलग दोन दिवस काळ्या फिती लावून निषेध

5नोव्हेंबर : सामूहिक रजा

16 नोव्हेंबरपासून : बेमुदत काम बंद आंदोलन

-------------------------------------------

“न्यायालयीन कर्मचाऱ्यांना समान वेतनासाठी राज्य शासनाकडे निवेदनाद्वारे वारंवार मागणी, विनंती केली आहे. मात्र, दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे बेलिफ कर्मचारी महासंघ, स्टेनोग्राफर असोसिएशन, गट 'ड' कर्मचारी महासंघ, कर्मचारी महासंघ गट 'क' अशा सर्वांनी मुंबईत एकत्रित येऊन आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.”

-रविंद्र पी सोनवणे, जिल्हाध्यक्ष, न्यायालयीन कर्मचारी गट क संघटना, वाशिम



0 Response to "न्यायालयीन कर्मचारी आंदोलनाच्या तयारीत. राज्यातील 34 हजार कर्मचारी समान वेतनासाठी एकवटणार"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article