वाशीमच्या गणेश वाघ याची एम.पी.एस.सी.मध्ये महाराष्ट्रातुन 29 वी रँक मिळवत श्रेणी 1 च्या पदाला गवसणी.
साप्ताहिक सागर आदित्य
वाशीमच्या गणेश वाघ याची एम.पी.एस.सी.मध्ये महाराष्ट्रातुन 29 वी रँक मिळवत श्रेणी 1 च्या पदाला गवसणी.
स्वतःच्या अभ्यासातून घेतली भरारी..
वाशीम, : जिल्ह्यातील आडगाव हजारे येथील अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील मुलाची महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एम. पी. एस. सी.) 2025 अंतर्गत घेतलेल्या परीक्षेमध्ये दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक व राज्यकर निरीक्षक पदांना त्याने स्वतः कुठल्याही क्लासेस ला न जाता अपार मेहनत व कठोर अभ्यास करून हे यश संपादन केला आहे.
गणेश भाऊराव वाघ यांची घरची परिस्थिती वडील अल्पभुधारक शेतकरी आई गृहीनी व एक मुलगी व दोन मुले त्यातील गणेश वाघ हा मोठा मुलगा असून एक बहीण व एक लहान भाऊ आहे, गणेश यांचं आठवीपर्यंत शिक्षण आडगाव येथील जिल्हा परिषद शाळेत झाले व पुढील बारावी पर्यंतचे शिक्षण स्वामी विवेकानंद विद्यालय कोकलगाव येथे झाले त्यानंतर समाजकार्य विषयात त्यांनी सरस्वती समाजकार्य महाविद्यालय येथुन पदवी प्राप्त केली. व पदवी सुरू असतानाच त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली. सुरुवातीला ग्रामीण भागातुन असल्यामुळे अनेक अडचणींना त्यांना सामोरे जावे लागले पण जिद्द, मेहनत व चिकाटीच्या जोरावर त्यांनी आपले कष्ट नियमित सुरू ठेवले याचच फळ म्हणून त्यांना 2023 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( एम.पी.एस.सी. ) तुन 11 फेब्रुवारी 2025 निकाल लागला 06 ऑक्टोबर 2025 आयटीआय लिपिक म्हणुन पदभार स्वीकारला, मात्र त्यांचे स्वप्न हे श्रेणी ०१ पद घेणे हे होतं त्यामुळे त्यांनी इतक्यावरच न थांबता नोकरीसोबतच अभ्यास कायम करत आपली तयारी सुरू ठेवली, आणि मे 2026 ला एमपीएससी मेन्स दिली. गणेश यांचा आयुष्य बदलणारा दिवस उजाडला आणि 14 ऑगस्ट रोजी निकाल लागला त्यामध्ये गणेश भाऊराव वाघ यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रामधुन 29 वी रँक मिळवत यश संपादन केल आहे.
यामध्ये दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक श्रेणी ०१ व राज्यकर निरीक्षक अशा दोन पदांना तो पात्र ठरला आहे. निवडीबाबत गणेश वाघ यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून नातेवाईक मित्रपरिवार यांच्यासह शिक्षक वर्ग व मार्गदर्शक सर्वांना त्यांचं हे यश त्यांच्या खडतर प्रवासामुळे खुप महत्त्वाचे वाटत असताना दिसत आहे. या यशाचे श्रेय त्यांनी आई, वडील आणि मार्गदर्शक मित्रांसह त्यांच्या सर्व शिक्षक वर्गाला दिले आहे.
विशेष बाब म्हणजे गणेश वाघ यांनी कोणत्याही प्रकारच्या महागड्या क्लासेस शिकवणी न लावता आणि मेट्रोसिटीत न जाता वाशीम सारख्या ठिकाणी राहुन आपल्या जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर स्वतः अभ्यास करून हे यश मिळवला आहे आज स्पर्धा परीक्षेची तयारी करायची म्हटलं तर अनेक विद्यार्थी मोठे क्लासेस आणि मेट्रो सिटीत राहुन अभ्यास करायचा म्हणतात मेट्रोसिटीत हवं ते वातावरण आणि सर्व बाबी उपलब्ध असतात असं त्यांचं म्हणणं असतं मात्र याला फाटा देत गणेश वाघ यांनी कुठलाही अवाजवी खर्च न करता व कुठल्याही क्लासेस आणि खाजगी शिकवणीवर खर्च न करता सेल्फ स्टडी करून हे यश मिळवला आहे, त्यामुळे त्यांच्यावर सर्वच स्तरातुन कौतुकाचा वर्षाव होत आहे.
0 Response to "वाशीमच्या गणेश वाघ याची एम.पी.एस.सी.मध्ये महाराष्ट्रातुन 29 वी रँक मिळवत श्रेणी 1 च्या पदाला गवसणी."
Post a Comment