मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील सुवर्णकाराची कन्या कुमारी यज्ञा जगदीश दुसाने या चिमुकली सोबत एका हरामखोराने शारीरिक अत्याचार करून तिची निर्गुण हत्या केली अशा हरामखोराला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे..
साप्ताहिक सागर आदित्य
मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील सुवर्णकाराची कन्या कुमारी यज्ञा जगदीश दुसाने या चिमुकली सोबत एका हरामखोराने शारीरिक अत्याचार करून तिची निर्गुण हत्या केली अशा हरामखोराला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे..
शेवटचा श्वास,शेवटची आस
रानात वारा कापे थरथर..
आभाळात काळे ढग पळी भरभर
राक्षसाच्या मनात कसा हा अंधार
कधी थांबणार हा विकृतीचा भार?
निरागस चिमुकलीचा उगवता सूर्य..
चिमुकली होती हसत बिचारी
गुलाबाची जशी उमलती कळी
पण या काळाने केला तिचा घात
किती हा विनाश कसा हा आघात
क्रूरता विकृती माणुसकीचा रह्यास..
नजरेत विष मनात क्रूरता
कशी जन्मली पहा विकृती ही आता?
माणूस असूनही कसा ढोर झाला
कुठे गेली सांगा माणुसकी आम्हाला?
आईच्या मनातील आढळ वेदना..
आईच्या मनात हे कायम राही
क्षणातच चिमुकली तिची अवघ जग सोडून जाई
काय चूक माझी कुणीतरी सांगा
हा प्रश्न तिचा हवेतच राही..
निसर्गाचा आक्रोश..
सोडताना प्राण ती रडल आभाळ
दरी दरीतून वाहिला आस्वांचा काल.
कुठ जाताय तुम्ही रे पोर
वीट संस्कारांची ढील्ली केली पार
कठोर न्यायाची मागणी..
या राक्षसांना काय जाब विचारणार?
भर चौकात सरकार चौरंग करा न
अशांवर मेहरबानी कसली -
न्याय हवा कठोर, निर्भय, चैतन्यदर्शी
समाजाला अंतिम संदेश..
आज वेळ आहे उभा राहण्याची
अन्यायाच्या छातीत पाय रोवण्याची
जपूयान सारे चिमुकल्या ना आता
त्यांच्या हसण्यानेच उजळवू पृथ्वी ही आता..
मानवता ठेवू जागी सारी
बघू मग कुठे जाते राक्षसहि सारी
आवाज हा आता साऱ्यांनीच उचलावा
चिमुकल्यांचे जीवन सुरक्षित ठेवा..
हा माझा लेख जास्तीत जास्त शेअर करून आपल्या चिमुकलीला न्याय मिळवून देऊ..🙏🏻
✍🏻सुहास गायकवाड.
घोटी ता. किनवट जि. नांदेड
0 Response to "मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील सुवर्णकाराची कन्या कुमारी यज्ञा जगदीश दुसाने या चिमुकली सोबत एका हरामखोराने शारीरिक अत्याचार करून तिची निर्गुण हत्या केली अशा हरामखोराला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे.."
Post a Comment