-->

नगर परिषद व नगर पंचायत सार्वत्रिक निवडणुक २०२५  आदर्श आचारसंहितेचे पालन करावे                            जिल्हाधिकारी कुंभेजकर

नगर परिषद व नगर पंचायत सार्वत्रिक निवडणुक २०२५ आदर्श आचारसंहितेचे पालन करावे जिल्हाधिकारी कुंभेजकर

 


साप्ताहिक सागर आदित्य 

नगर परिषद व नगर पंचायत सार्वत्रिक निवडणुक २०२५

आदर्श आचारसंहितेचे पालन करावे          

                जिल्हाधिकारी कुंभेजकर


राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका २०२५ या अनुषंगाने नगर परिषद व नगर पंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, संबंधित नगर परिषद व नगर पंचायतींच्या कार्यक्षेत्रात निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली असून आदर्श आचारसंहितेचे पालन करावे असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर केले आहे.


आचारसंहिता ही संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संपूर्ण क्षेत्रासाठी लागू राहील, तसेच पोटनिवडणुकीच्या बाबतीत ती फक्त संबंधित प्रभाग, निवडणूक विभाग किंवा निर्वाचक गणापुरती लागू आहे.


जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी पुढे सांगितले की, निवडणूक होणाऱ्या संस्थेच्या क्षेत्रापुरतीच आचारसंहिता लागू असली तरी त्या बाहेरील परिसरात आयोजित कार्यक्रमांमुळे मतदारांवर परिणाम होणार असल्यास असे कार्यक्रम आयोजित करता येणार नाहीत.


राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशांची तंतोतंत अंमलबजावणी होईल याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. कुंभेजकर यांनी दिले आहेत.

0 Response to "नगर परिषद व नगर पंचायत सार्वत्रिक निवडणुक २०२५ आदर्श आचारसंहितेचे पालन करावे जिल्हाधिकारी कुंभेजकर"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article