जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणूक अंतिम आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्धी
साप्ताहिक सागर आदित्य
जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणूक
अंतिम आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्धी
वाशिम, जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने अंतिम आरक्षण प्रसिद्धी आज दि.३ नोव्हेंबर रोजी करण्यात आली.
जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी अंतिम आरक्षणाची अधिसूचना जारी केली. त्यानुसार सर्व तहसील कार्यालये, जिल्हा परिषद, पंचायत समित्या येथील सूचना फलकावर, तसेच जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्धी करण्यात आली आहे.
वाशिम जिल्हा परिषदेत एकूण ५२ जागा, कारंजा पंचायत समिती १६ निर्वाचक गण, मानोरा पंचायत समिती १६ निर्वाचक गण, पंचायत समिती मंगरूळपीर १६ निर्वाचक गण, मालेगाव पंचायत समिती १८ निर्वाचक गण , रिसोड पंचायत समिती १८ निर्वाचक गण, वाशिम पंचायत समिती २० निर्वाचक गणांचे आरक्षण निश्चित आहे.
विभागीय आयुक्त डॉ.श्वेता सिंघल यांनी प्राप्त हरकती व आक्षेप अर्जावर २८ ऑक्टोबर रोजी सुनावणी घेऊन परिशिष्ट १२ मधील अभिप्रायाचा विचार करून निवडणूक विभाग/ निर्वाचक गणाचे अंतिम आरक्षणास मान्यता प्रदान केली आहे.
0 Response to " जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणूक अंतिम आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्धी"
Post a Comment