
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आरक्षणासाठी १३ ऑक्टोबर रोजी विशेष सभांचे आयोजन
साप्ताहिक सागर आदित्य
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आरक्षणासाठी १३ ऑक्टोबर रोजी विशेष सभांचे आयोजन
जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे आवाहन
वाशिम, दि. ९ ऑक्टोबर
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ मधील तरतुदीनुसार तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पद्धत व चक्रानुक्रम) नियम, २०२५ नुसार जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या जागांचे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित करण्यासाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे.
ही सभा सोडत पद्धतीने घेण्यात येणार असून, जिल्हा परिषद व विविध पंचायत समित्यांच्या सभांचे आयोजन खालीलप्रमाणे करण्यात आले आहे .
जिल्हा परिषद, वाशिम सभेचे ठिकाण जिल्हा नियोजन भवन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम १३ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १ वाजता, पंचायत समिती, कारंजा पंचायत समिती सभागृह, कारंजा १३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता,
पंचायत समिती, मानोरा तहसील कार्यालय, मानोरा १३ ऑक्टोबर २०२५ दुपारी ३ वाजता,
पंचायत समिती, मंगरुळपीर पंचायत समिती सभागृह, मंगरुळपीर १३ ऑक्टोबर २०२५ दुपारी ३ वाजता,
पंचायत समिती, मालेगाव तहसील कार्यालय, मालेगाव १३ ऑक्टोबर २०२५ सकाळी ११ वाजता
पंचायत समिती, रिसोड तहसील कार्यालय, रिसोड १३ ऑक्टोबर २०२५ सकाळी ११ वाजता,
पंचायत समिती, वाशिम तहसील कार्यालय, वाशिम १३ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता.
जिल्हा परिषद अथवा पंचायत समिती क्षेत्रातील ज्या नागरिकांना या सभेत उपस्थित राहायचे आहे, त्यांनी वरील वेळापत्रकानुसार संबंधित ठिकाणी व वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.
0 Response to "जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आरक्षणासाठी १३ ऑक्टोबर रोजी विशेष सभांचे आयोजन "
Post a Comment