-->

जिल्हाधिकाऱ्यांची मुसळवाडी येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, जि.प.प्राथमिक शाळा, अंगणवाडीला भेट

जिल्हाधिकाऱ्यांची मुसळवाडी येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, जि.प.प्राथमिक शाळा, अंगणवाडीला भेट



साप्ताहिक सागर आदित्य 

 जिल्हाधिकाऱ्यांची मुसळवाडी येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, जि.प.प्राथमिक शाळा, अंगणवाडीला भेट


वाशिम,दि.१ ऑक्टोबर  जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी मालेगाव तालुक्यातील मुसळवाडी येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेला भेट दिली. यावेळी आश्रमशाळेतील भौतिक सुविधांची पाहणी करून वर्गात जाऊन विद्यार्थ्यांसमवेत संवाद साधला. 

यावेळी त्यांच्यासमवेत अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, उपजिल्हाधिकारी विरेंद्र जाधव, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, तहसीलदार दीपक पुंडे आदी उपस्थित होते.

 या भेटीदरम्यान वसतीगृहाची पाहणी सुध्दा जिल्हाधिकाऱ्यांनी केली. विद्यार्थ्यांसमवेत संवाद साधताना जिल्हाधिकारी म्हणाले, वृत्तपत्र वाचनाची सवय लावावी. शिष्यवृत्ती व नवोदयच्या परिक्षा द्या.ध्येय निश्चित करा. स्पर्धा परिक्षेची तयारी करा असे सांगितले. यासोबतच मुख्याध्यापक व शिक्षकवृंदाना शैक्षणिक व भौतिक सुविधांबाबत आवश्यक ते निर्देश देत शिक्षणाचा दर्जा कसा वाढविता येईल यासाठी मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याध्यापक एस.डी.काळबांडे अधिक्षक एन.एस.म्हस्के, अधिक्षिका श्रीमती मातने यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


जि.प.शाळेला व अंगणवाडीला भेट

जिल्हाधिकाऱ्यांनी जि.प.प्राथमिक शाळेलाही भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसमवेत वर्गात जाऊन संवाद साधत विद्यार्थ्यांच्या उजळणीचा धडा गिरविला.यासोबतच इथेही शैक्षणिक व भौतिक सुविधेची पाहणी केली. यावेळी मुख्याध्यापक प्रकाश चव्हाण, केंद्रप्रमुख संजय गंगथडे उपस्थित होते. नंतर अंगणवाडीमध्ये जाऊन चिमुकल्या विद्यार्थ्यांसमवेत संवाद साधला.यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी मदन नायक यांनी अंगणवाडीबद्दल माहिती दिली.

0 Response to "जिल्हाधिकाऱ्यांची मुसळवाडी येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, जि.प.प्राथमिक शाळा, अंगणवाडीला भेट"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article