-->

आज जिल्ह्यात विद्यार्थी मार्गदर्शन अभियानास सुरूवात   जीवनविद्या मिशन तर्फे विद्यार्थ्यांसाठी  स्तुत्य उपक्रमाची भेट....!!

आज जिल्ह्यात विद्यार्थी मार्गदर्शन अभियानास सुरूवात जीवनविद्या मिशन तर्फे विद्यार्थ्यांसाठी स्तुत्य उपक्रमाची भेट....!!



साप्ताहिक सागर आदित्य 

  जिल्ह्यात विद्यार्थी मार्गदर्शन अभियानास सुरूवात 

जीवनविद्या मिशन तर्फे विद्यार्थ्यांसाठी

स्तुत्य उपक्रमाची भेट....!!

             

वाशिम: जीवनविद्या मिशन,मुंबई तर्फे जिल्ह्यात वाशिम व मालेगाव तालुक्यातील ठराविक शाळांमध्ये आजपासून पुढील तीन दिवस म्हणजेच सोमवार १५ ते बुधवार १७ सप्टेंबर २०२५ दरम्यान विद्यार्थी मार्गदर्शन अभियानास  सुरूवात झाली असून विद्यार्थ्यांसाठी ह्या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन विविध ठिकाणी करण्यात आले आहे.

               "तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, विचार बदला नशिब बदलेल, तुमचे भाग्य तुमच्या विचारात, प्रयत्न हे रत्न

देवापेक्षाही श्रेष्ठ होय, कारण देवासकट सर्वकाही मिळ्वून देण्याचे सामर्थ्य प्रयत्नांत आहे"* अशा प्रकारचे तेजस्वी क्रांतीकारक विचार देऊन अखिल विश्वमानवामध्ये जागृती निर्माण करणारे विश्वसंत सदगुरू श्री.वामनराव पै यांचे ५० ते ६० अनुयायांचे या पर्वावर जिल्ह्यात आगमन झालेले आहे.हे विद्यार्थी मार्गदर्शन अभियान सदगुरू श्री.वामनराव पै यांचे मार्गदर्शनाखाली गेली अनेक दशके विनामूल्य राबविले जात आहे.सर्व स्तरातील लोकांपर्यत जीवनविद्यारूपी जीवन संजीवनी पोहचविणे तसेच हे जग सुखी व्हावे आणि हिंदुस्थान हे राष्ट्र सर्व प्रगत राष्ट्रांच्या ही पुढ़े प्रगती पथावर जावे हे सदगुरूंचे दोन दिव्य संकल्प सिद्धिस नेणे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत कार्य करीत आहे.विद्यार्थी हे राष्ट्राचे आधारस्तंभ आहेत, हे लक्षात घेऊन मुलांनी चांगला अभ्यास करुन उत्तम यश कसे संपादन करावयाचे, याचे योग्य मार्गदर्शन करुन नितीमूल्यांची शिकवण जीवनविद्या विविध विषयामार्फत जिल्ह्यात वाशिम व मालेगाव तालुक्यातील ठराविक शाळांमध्ये पुढील तीन दिवस म्हणजेच १५ ते १७ सप्टेंबर दरम्यान करणार आहेत.आजचा विद्यार्थी हा उद्याचा नागरीक असल्याने त्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे

आहे, म्हणुन जीवनविद्येचे हे मौलिक मार्गदर्शन विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावे व हे विद्यार्थी राष्ट्राचे उत्तम नागरीक व्हावेत, ही संकल्पना रूजविण्यासाठी जीवनविद्या मिशन हा उपक्रम विनामूल्य तथा समाजसेवेचे एक उत्तरदायित्व म्हणून राबवित आहे. ह्या विद्यार्थी मार्गदर्शन कार्यकर्माचा अवधी साधारणतः ३० ते ५० मिनिटांपर्यत राहणार आहे.तेव्हा अधिक माहिती करीता दिलीप निर्मळ, पोलिस निरीक्षक, मुंबई भ्रमणध्वनी क्रमांक ९८७०३१०१३७ व अनिल घुनागे वाशिम भ्रमणध्वनी क्रमांक ९४२२९३९३०१  यांचेशी संपर्क साधावा तथा शालेय विद्यार्थ्यांनी यांचा बहुसंख्येने लाभ घ्यावा,असे आवाहन स्थानिक जीवनविद्या मिशन तर्फे करण्यात येत आहे.

0 Response to "आज जिल्ह्यात विद्यार्थी मार्गदर्शन अभियानास सुरूवात जीवनविद्या मिशन तर्फे विद्यार्थ्यांसाठी स्तुत्य उपक्रमाची भेट....!!"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article