नागपूर व महाराष्ट्राची कन्या बुद्धिबळपटू दिव्या देशमुख यांचा सार्थ अभिमान
साप्ताहिक सागर आदित्य
वृत्त क्र. 3061
नागपूर व महाराष्ट्राची कन्या बुद्धिबळपटू दिव्या देशमुख यांचा सार्थ अभिमान
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्य शासनातर्फे करण्यात येणार सन्मान
नागपूर, दि. २८ : नागपूर व महाराष्ट्राची कन्या बुद्धिबळपटू दिव्या देशमुख यांनी किशोरवयातच जागतिक बुद्धिबळस्पर्धेत विजेतेपद पटकावले असून 'ग्रँड मास्टर' हा किताब मिळविला आहे, त्यांची ही कामगिरी अभिमानास्पद असल्याचे सांगून राज्य शासनाच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
रामगिरी शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. दिव्या देशमुख यांनी भारतीय बुद्धिबळपटू कोनेरू हम्पी यांना जागतिक बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभूत करून ही महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. कोनेरू हम्पी यांचे अभिनंदन करत दिव्या देशमुख यांनी दुसऱ्यांदा या स्पर्धेत सहभाग घेत यशोशिखर गाठल्याचे त्यांनी सांगितले. दिव्या देशमुख यांनी वयाच्या १९ व्या वर्षी ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांनी आतापर्यंत विविध स्पर्धेत २३ सुवर्ण पदकांसह जवळपास ३५ पदके पटकावली आहेत.
दिव्या देशमुख यांच्या या कामगिरीचा राज्य शासनाच्या वतीने सन्मान करण्यात येईल. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी चर्चा करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
००००००
वृत्त क्र. 3060
शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मिडिया वापराबाबत मार्गदर्शक सूचना
शासन निर्णय निर्गमित
मुंबई, दि. २८ : राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडियाचा वापर करण्याबाबत नवे मार्गदर्शक नियम जाहीर केले असून त्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
डिजीटल युगात सोशल मीडिया हे संवादाचे प्रभावी साधन असले तरी त्यातून गोपनीय माहितीचा प्रसार, खोटी माहिती पसरवणे, तसेच शासकीय नियमांचे उल्लंघन होवू नये याकरिता मार्गदर्शक तत्त्वे आखण्यात आली आहेत.
सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ हे सोशल मीडियाच्या वापराबाबतही लागू राहतील. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ नुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.
महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना :-
राज्य शासनातील अधिकारी-कर्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्था, मंडळे, महामंडळे, सार्वजनिक उपक्रम तसेच प्रतिनियुक्तीने किंवा करारपद्धतीने नेमलेले कर्मचारी यांना हे नियम लागू राहणार आहेत.
शासनाच्या किंवा भारतातील कोणत्याही शासनाच्या चालू किंवा अलिकडच्या धोरणावर प्रतिकूल टीका करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच सोशल मीडियाचा वापर जाणीवपूर्वक आणि जबाबदारीने करावा.
वैयक्तिक आणि कार्यालयीन सोशल मीडिया अकाऊंट स्वतंत्र ठेवावेत. केंद्र किंवा राज्य शासनाने बंदी घातलेल्या वेबसाईट किंवा अॅपचा वापर करू नये. शासकीय योजना व उपक्रमांच्या प्रसारासाठी केवळ अधिकृत आणि प्राधिकृत माध्यमांचा वापर करावा.
कार्यालयीन कामकाजाच्या समन्वयासाठी व्हॉट्सअॅप, टेलिग्रामसारख्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा वापर करता येईल.
शासकीय योजनांच्या यशस्वितेसंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट करता येईल; मात्र त्यातून स्वयंप्रशंसा होणार नाही याची दक्षता घ्यावी. वैयक्तिक अकाऊंटवर शासकीय पदनाम, लोगो, गणवेश, शासकीय मालमत्तेचे फोटो किंवा व्हिडिओ अपलोड करू नयेत. आक्षेपार्ह, द्वेषमूलक, भेदभाव करणारा मजकूर पोस्ट किंवा फॉरवर्ड करणे मनाई आहे. प्राधिकृत मंजुरीशिवाय कोणतेही गोपनीय दस्तऐवज सोशल मीडियावर अपलोड करू नयेत. बदली झाल्यानंतर कार्यालयीन सोशल मीडिया अकाऊंट योग्य प्रकारे हस्तांतरित करावे.
शासनाने स्पष्ट केले आहे की, या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर शिस्तभंगात्मक कारवाई केली जाईल. डिजिटल युगात सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर व्हावा आणि शासकीय यंत्रणेचा विश्वासार्हता अबाधित राहावी, यासाठी नियमावली करण्यात आली आहेत.
००००
राजू धोत्रे/विसंअ/
वृत्त क्र. 3059
मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)
बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय पटावर महाराष्ट्राचे नाव, दिव्या देशमुख भारताचा अभिमान..!
विश्वविजेत्या दिव्या देशमुख यांचे मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांच्याकडून अभिनंदन...!
मुंबई, दि. २८ : - महिला बुद्धिबळ विश्वचषकावर नाव कोरून ग्रँण्ड मास्टर दिव्या देशमुख यांनी भारताची मान गौरवाने उंचावली आहे. विशेषतः महाराष्ट्राची पहिली ग्रँण्ड मास्टर..विश्वविजेती म्हणून महाराष्ट्राचे नाव बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय पटावरही सुवर्णाक्षरांनी नोंदवले आहे. या कामगिरीसाठी तमाम महाराष्ट्राच्यावतीने दिव्या देशमुख यांचे मनःपूर्वक अभिनंदन, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला बुद्धिबळ विश्वचषक विजेत्या दिव्या देशमुख यांचे अभिनंदन केले आहे. तसेच त्यांनी उपविजेत्या ग्रँण्ड मास्टर कोनेरू हम्पी यांचेही अभिनंदन केले आहे.
बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय पटावरील या दोन्ही भारतीय खेळाडूंच्या चालींकडे अवघ्या बुद्धिबळ जगताची नजर खिळली होती, हा देखील भारतीय बुद्धिबळ क्षेत्रासाठी अपूर्व आणि अभिमानास्पद योग असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी नमूद केले आहे.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस शुभेच्छा संदेशात म्हणतात, महिला विश्वचषक स्पर्धेत दुसऱ्याच प्रयत्नात दिव्या यांनी भारतीय विक्रम नोंदवला आहे. महिला कॅन्डिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरणाऱ्या पहिल्या किशोरवयीन बुद्धिबळपटू ठरल्या आहेत. यासोबतच आता त्या भारताची चौथ्या महिला ग्रँडमास्टर ठरल्या आहेत. आतापर्यंत त्यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर ४० वेळा भारताचे प्रतिनिधीत्व करत, ३५ वेळा पदक पटकाविले आहे. यात तब्बल २३ सुवर्ण, ७ रौप्य आणि ५ ब्राँन्झ पदकांचा समावेश आहे. बुद्धिबळाच्या विश्वविजेते पदासाठी दोन भारतीय बुद्धिबळपटूंची लक्षवेधी झुंज जगासाठीही उत्कंठावर्धक ठरली, हे देखील विशेष मानावे लागेल. बुद्धिबळासारख्या खेळात भारतीय महिला खेळाडूंनी घेतलेली झेप महत्वाचीच अशी आहे. दिव्या आणि कोनेरू यांच्या पटावरील चाली या तोडीस तोड होत्या. या दोघींनीही आपल्या खेळीने इतिहास रचला आहे. यातून भारताला आणखी एक ग्रँण्डमास्टर बुद्धिबळपटू मिळाली आहे. तीही महाराष्ट्रातून हे विशेष. या दोघींचे यश हे भारतातल्या उदयोन्मुख बुद्धिबळपटूंना प्रेरणादायी ठरणार आहे. हे यश भारताच्या क्रीडा लौकीकात भर घालणारे आहे. या यशासाठी दिव्या आणि कोनेरु यांचे मनापासून अभिनंदन. ग्रँण्डमास्टर दिव्या देशमुख यांची विश्वविजेती कामगिरी म्हणजे महाराष्ट्रासाठी सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावी असा क्षण आहे. या विश्वविजयी कामगिरीसाठी ग्रँण्डमास्टर दिव्या देशमुख यांचे मनापासून अभिनंदन. त्यांच्या सातत्यपूर्ण यशासाठी मेहनत घेणाऱे प्रशिक्षक - मार्गदर्शक तसेच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणारे आई-वडील व देशमुख परिवारातील सर्वांचे मनापासून अभिनंदन..ग्रँण्डमास्टर दिव्या यांच्याकडून यापुढे कॅँण्डिडेटस् स्पर्धेतही असाच विजय साकारला जाईल असा विश्वास आहे. त्याकरिता त्यांना खूप खूप शुभेच्छा, असेही मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
००००
वृत्त क्र. 3058
दिल्लीमध्ये महाराष्ट्र शासनामार्फत उभारण्यात येणाऱ्या
सांस्कृतिक भवनाचा आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर
नवी दिल्ली, 28 : दिल्लीतील 98 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात महाराष्ट्र शासनामार्फत दिल्लीमध्ये बहुउद्देशीय सांस्कृतिक भवन उभारण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. महाराष्ट्र सदन परिसरात त्यासाठी जागा निश्चित करण्यात आली असून त्याचा प्रस्तावित आराखडा निवासी आयुक्त तथा सचिव आर विमला यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नुकताच सादर केला.
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यावेळी महाराष्ट्र सदनाच्या अनुषंगाने झालेल्या बैठकीत श्रीमती आर विमला यांनी विविध प्रस्ताव सादर केले. यामध्ये प्रामुख्याने सांस्कृतिक भवनाबाबत सविस्तर चर्चा झाली. या सांस्कृतिक भवनामध्ये बहूउद्देशीय सभागृह, महाराष्ट्रातील भारतीय प्रशासकीय सेवेतील विविध पदांसाठी मुलाखत पात्र उमेदवारांसाठी निवास व्यवस्था, प्रशस्त ग्रंथालय व अभ्यासिका व अनुषंगिक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली.
तसेच महाराष्ट्र सदन परिसरातील अधिकारी व कर्मचारी निवासस्थाने आणि अन्य प्रशासकीय बाबींसंदर्भात सविस्तर सादरीकरण निवासी आयुक्त श्रीमती विमला यांनी केले. यासह महाराष्ट्रातील ऋतूनिहाय फळांचे प्रदर्शन व विक्री दालन आणि बचत गटांच्यामार्फत उत्पादित वस्तूचे प्रदर्शन दालन वर्षभरासाठी य ठिकाणी असावे या संदर्भात सुरु असलेल्या नियोजनची माहिती यावेळी देण्यात आली. महाराष्ट्र महोत्सव दिल्लीत आयोजित करण्यात यावा यामध्ये महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडाविणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम करण्याचे प्रस्तावित आहेत. यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भातील मागणीही करण्यात आली. मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी या सर्व प्रकल्पाबाबत सकारात्मकता दर्शविली असून पुढील कार्यवाही करण्यासंदर्भात सूचना दिल्या.
0000
वृत्त क्र. 3057
राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी
३१ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई, दि. २८ : दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त प्रातिनिधिक स्वरूपात शिक्षकांना क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. सन २०२५ च्या पुरस्कारासाठी इच्छुक शिक्षकांनी ३१ जुलै २०२५ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षण संचालक महेश पालकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
या पुरस्कारासाठी राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व मान्यताप्राप्त अनुदानित खासगी प्राथमिक / माध्यमिक / उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांनी आपली आवेदने ३१ जुलै २०२५ रोजी सायं. ५.०० वाजेपर्यंत https://forms.gle/ixTDiuvgqqEwVuaA7 या लिंकवर ऑनलाईन सादर करावीत, असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
0000
मोहिनी राणे/ससं/
वृत्त क्र. 3056
पर्यटनविषयक कार्यक्रमांसाठी प्रायोजकत्वाचे प्रस्ताव
ऑनलाईन सादर करणे बंधनकारक
मुंबई दि. 28 : महाराष्ट्रातील पर्यटनविषयक विविध महोत्सव, कार्यक्रम आणि उपक्रमांना प्रायोजकत्व मिळवण्यासाठी महत्त्वाचा बदल जाहीर करण्यात आला आहे. यापुढे प्रायोजकत्वासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे सर्व प्रस्ताव महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या maharashtratourism.gov.in या अधिकृत संकेतस्थळाद्वारे ऑनलाईन पद्धतीने सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे, पर्यटन विभागाने प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
या संदर्भात, 30 एप्रिल, 2025 च्या शासन निर्णयानुसार हा बदल करण्यात आला आहे. आतापर्यंत विविध शासकीय संस्था, सेवाभावी संस्था आणि खासगी संस्थांद्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या पर्यटनविषयक कार्यक्रमांचे प्रायोजकत्वाचे प्रस्ताव थेट कार्यालयात सादर केले जात होते. नवीन कार्य पद्धतीनुसार, कोणताही कार्यक्रम आयोजित करण्यापूर्वी 30 दिवस अगोदर पर्यटनविषयक प्रायोजकत्वाचे प्रस्ताव ऑनलाइन सादर करणे आवश्यक आहे.
यासाठी संदर्भाकरिता https://sponsorship.maharashtratourism.gov.in ही थेट लिंक देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व संबंधित शासकीय संस्था, सेवाभावी संस्था आणि खासगी संस्थांना आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनी या बदलाची नोंद घ्यावी आणि यापुढे प्रायोजकत्व निधी मागणीचे प्रस्ताव महाराष्ट्र पर्यटनाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीनेच सादर करावेत. स्थानिक पातळीवरील संबंधितांनाही याबाबत माहिती देण्याची सूचना देण्यात आली आहे.
हा निर्णय पर्यटन विभागाच्या कामकाजात अधिक सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने घेण्यात आला आहे. यामुळे प्रायोजकत्व प्रक्रिया अधिक वेगवान आणि कार्यक्षम होणार आहे. ऑनलाईन प्रक्रियेमुळे निधी वितरणात एकसमानता आणि गतिमानता येईल, तसेच प्रशासकीय कामकाजात सुलभता येणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
00000
संध्या गरवारे /वि.सं.अ/
वृत्त क्र. 3055
कोकण किनारपट्टीला ३.८ ते ४.३ मीटर उंच लाटांचा इशारा
मुंबई, दि. २८ :- भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्रामार्फत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना २८ जुलै २०२५ सायंकाळी ५.३० ते ३० जुलै २०२५ रोजीचे रात्रौ ८.३० पर्यंत ३.८ ते ४.३ मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या असून समुद्राची धूप आणि उंच लाटांचे तडाखे समुद्र किनारी येण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
राज्यात पुढील २४ तासांसाठी पुणे घाट या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गोसीखुर्द प्रकल्प (वैनगंगा नदी) येथून २ लाख ४७ हजार ३ क्यूसेक्स, उजनी धरणातून ४१ हजार ६०० क्यूसेक्स, भिमा नदी दौंड पूल येथून ३२ हजार ६४० क्युसेक विसर्ग करण्यात आला असून नागरिकांना जिल्हा प्रशासनामार्फत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
वाशिम जिल्ह्यातील पैनगंगा नदीला पूर आल्याने सरपखेड धोडप बुद्रुक मार्ग काही वेळासाठी बंद करण्यात आला होता. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात आपत्तीच्या अनुषंगाने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांना आपत्कालीन परिस्थितीत सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
तसेच कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरणात ९१ हजार ५४८ क्युसेक इतकी आवक होत असून धरणातून १ लाख २० हजार क्युसेक पाण्याची जावक असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.
००००
एकनाथ पोवार/विसंअ/
Maharashtra Shines on the Global Chess Stage – Divya Deshmukh Makes India Proud!
Chief Minister Devendra Fadnavis congratulates World Champion Grandmaster Divya Deshmukh
Mumbai, July 28: Grandmaster Divya Deshmukh has etched her name on the Women's World Chess Championship trophy, raising India’s pride to new heights. Notably, as the first woman Grandmaster from Maharashtra to become a world champion, she has inscribed Maharashtra’s name in golden letters on the international chessboard. Chief Minister Devendra Fadnavis extended heartfelt congratulations on behalf of the entire state of Maharashtra to Divya Deshmukh for this remarkable achievement. He also congratulated runner-up Grandmaster Koneru Humpy.
Chief Minister Fadnavis noted that the moves of both these Indian chess players captivated the entire chess world, making this moment a rare and proud occasion for Indian chess.
In his congratulatory message, CM Fadnavis stated, “In just her second attempt, Divya has set a national record at the Women’s World Chess Championship. She is the first teenage chess player to qualify for the Women Candidates Tournament and is now India’s fourth woman Grandmaster. She has represented India internationally 40 times and has won 35 medals, including 23 gold, 7 silver, and 5 bronze. The gripping contest between two Indian chess players for the world title was a historic spectacle, and the rise of Indian women in a sport like chess is highly significant.”
He added, “The moves made by Divya and Koneru were equally matched. Both have made history with their games. India has now gained another Grandmaster – this time from Maharashtra. Their success will serve as an inspiration to emerging chess talents in the country and will further enhance India’s sports reputation.”
“The world-title-winning feat of Grandmaster Divya Deshmukh is a moment of glory for Maharashtra to be written in golden letters,” CM Fadnavis said. “Heartfelt congratulations to her. I also extend my best wishes to her dedicated coaches and mentors, her supportive parents, and the entire Deshmukh family. I am confident Divya will continue her winning streak in the upcoming Candidates Tournament as well. Best wishes for her continued success,” he concluded.
0000
अंतरराष्ट्रीय शतरंज मंच पर महाराष्ट्र का नाम रोशन – दिव्या देशमुख ने बढ़ाया भारत का गौरव!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने विश्व विजेता ग्रँडमास्टर दिव्या देशमुख को दी बधाई
मुंबई, 28 जुलाई: महिला विश्व शतरंज चैंपियनशिप का खिताब जीतकर ग्रँडमास्टर दिव्या देशमुख ने भारत का मान गर्व से ऊँचा कर दिया है। खास बात यह है कि महाराष्ट्र की पहली महिला ग्रँडमास्टर के रूप में विश्वविजेता बनकर उन्होंने अंतरराष्ट्रीय शतरंज की दुनिया में महाराष्ट्र का नाम स्वर्णाक्षरों में दर्ज कराया है। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने इस अद्वितीय उपलब्धि के लिए दिव्या देशमुख को पूरे महाराष्ट्र की ओर से हार्दिक बधाई दी है। उन्होंने उपविजेता ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी को भी शुभकामनाएं दी हैं।
मुख्यमंत्री श्री. फडणवीस ने कहा कि इन दोनों भारतीय खिलाड़ियों की चालों पर पूरे विश्व का शतरंज जगत टकटकी लगाए देख रहा था। यह भारतीय शतरंज के लिए एक अनोखा और गर्व का क्षण है।
अपने शुभकामना संदेश में मुख्यमंत्री श्री. फडणवीस ने कहा, “महिला विश्व चैंपियनशिप में अपने दूसरे ही प्रयास में दिव्या ने एक भारतीय कीर्तिमान स्थापित किया है। वह महिला कैंडिडेट्स टूर्नामेंट के लिए क्वालिफाई करने वाली पहली किशोरवयीन शतरंज खिलाड़ी बनी हैं। अब वे भारत की चौथी महिला ग्रँडमास्टर भी बन चुकी हैं। अब तक उन्होंने 40 बार भारत का अंतरराष्ट्रीय स्तर पर प्रतिनिधित्व करते हुए 35 पदक जीते हैं, जिनमें 23 स्वर्ण, 7 रजत और 5 कांस्य पदक शामिल हैं।”
मुख्यमंत्री श्री. फडणवीस ने यह भी कहा, “विश्व खिताब के लिए दो भारतीय खिलाड़ियों के बीच हुआ यह मुकाबला पूरी दुनिया के लिए आकर्षण का केंद्र रहा। शतरंज जैसे खेल में भारतीय महिला खिलाड़ियों की यह छलांग अत्यंत महत्वपूर्ण है। दिव्या और कोनेरू की चालें एक-दूसरे की बराबरी की थीं। दोनों ने अपनी प्रतिभा से इतिहास रच दिया है। भारत को एक और ग्रँडमास्टर शतरंज खिलाड़ी मिली है – वह भी महाराष्ट्र से। इन दोनों का यह यशस्वी सफर देश के नवोदित खिलाड़ियों के लिए प्रेरणास्त्रोत बनेगा और भारत की खेल प्रतिष्ठा को और भी ऊँचाई देगा।”
“ग्रँडमास्टर दिव्या देशमुख की यह विश्वविजयी उपलब्धि महाराष्ट्र के लिए स्वर्ण अक्षरों में लिखे जाने योग्य क्षण है। इस उपलब्धि के लिए दिव्या देशमुख को हार्दिक बधाई। उनके सतत प्रयास और सफलताओं के पीछे खड़े प्रशिक्षकों, मार्गदर्शकों और उनके माता-पिता तथा देशमुख परिवार को भी दिल से शुभकामनाएं। मुझे विश्वास है कि दिव्या कैंडिडेट्स टूर्नामेंट में भी इसी तरह की सफलता हासिल करेंगी। उन्हें ढेरों शुभकामनाएं,” ऐसा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने अपने संदेश में कहा।
००००
Design of Maharashtra Government’s Proposed Cultural Complex in Delhi Presented to Chief Minister Devendra Fadnavis
Multipurpose cultural centre to come up in Maharashtra Sadan premises
New Delhi, July 28: The Maharashtra government had earlier announced the construction of a multipurpose cultural complex in Delhi during the valedictory function of the 98th All India Marathi Literary Conference held in the capital. A suitable site for the same has been identified within the Maharashtra Sadan premises. The proposed design of the complex was recently presented to Chief Minister Devendra Fadnavis by Resident Commissioner and Secretary R. Vimala.
During a review meeting held in New Delhi as part of Chief Minister Fadnavis' visit, several proposals concerning Maharashtra Sadan were discussed, with a detailed focus on the upcoming cultural complex. The proposed facility will include a multipurpose auditorium, residential arrangements for shortlisted candidates appearing for civil service interviews, a spacious library and study hall, and related amenities.
Resident Commissioner R. Vimala also made a detailed presentation regarding the accommodation facilities for officers and staff within the Maharashtra Sadan premises, as well as other administrative matters. Additionally, she informed the Chief Minister about ongoing planning to set up a year-round exhibition and sale center showcasing seasonal fruits from Maharashtra and products made by self-help groups.
A proposal to organize a “Maharashtra Mahotsav” in Delhi was also discussed, which would feature a variety of cultural programs highlighting the folk culture of Maharashtra. A request was made for financial support for the same.
Chief Minister Devendra Fadnavis expressed a positive response to all the proposed initiatives and gave directions to proceed with further action.
0000
दिल्ली में महाराष्ट्र सरकार द्वारा प्रस्तावित सांस्कृतिक भवन की रूपरेखा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को सौंपी गई
महाराष्ट्र सदन परिसर में बनेगा बहुउद्देशीय सांस्कृतिक केंद्र
नई दिल्ली, 28 जुलाई: दिल्ली में आयोजित 98वें अखिल भारतीय साहित्य सम्मेलन के समारोप समारोह में महाराष्ट्र सरकार द्वारा दिल्ली में एक बहुउद्देशीय सांस्कृतिक भवन स्थापित किए जाने की घोषणा की गई थी। इसके लिए महाराष्ट्र सदन परिसर में स्थल निर्धारित किया गया है और इसका प्रस्तावित आराखड़ा हाल ही में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला द्वारा प्रस्तुत किया गया।
मुख्यमंत्री श्री. फडणवीस के दिल्ली दौरे के दौरान महाराष्ट्र सदन से संबंधित समीक्षा बैठक आयोजित की गई, जिसमें श्रीमती आर. विमला ने विभिन्न प्रस्तावों पर चर्चा की। बैठक में सांस्कृतिक भवन के विषय पर विशेष रूप से विस्तार से चर्चा की गई। प्रस्तावित भवन में बहुउद्देशीय सभागार, भारतीय प्रशासनिक सेवा की विभिन्न परीक्षाओं के लिए पात्र उम्मीदवारों के लिए निवास व्यवस्था, एक विस्तृत पुस्तकालय और अध्ययन कक्ष तथा अन्य सहायक सुविधाएं उपलब्ध कराए जाने की योजना है।
श्रीमती विमला ने महाराष्ट्र सदन परिसर में अधिकारियों और कर्मचारियों के निवास स्थान तथा अन्य प्रशासनिक पहलुओं से संबंधित विस्तृत प्रस्तुति भी दी। इसके साथ ही, महाराष्ट्र के ऋतु-विशेष फलों की प्रदर्शनी और विक्रय केंद्र तथा स्वयं सहायता समूहों द्वारा निर्मित उत्पादों की बिक्री हेतु एक स्थायी प्रदर्शनी केंद्र की योजना की जानकारी भी दी गई।
दिल्ली में एक "महाराष्ट्र महोत्सव" आयोजित करने का भी प्रस्ताव रखा गया, जिसमें महाराष्ट्र की लोकसंस्कृति को दर्शाने वाले विविध सांस्कृतिक कार्यक्रम शामिल होंगे। इस आयोजन के लिए आवश्यक निधि उपलब्ध कराने का अनुरोध भी किया गया।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने इन सभी प्रस्तावों पर सकारात्मक रुख दिखाया और आगामी कार्यवाही के लिए आवश्यक निर्देश दिए।
००००
Government Issues Guidelines for Use of Social Media by State Employees
Official GR Released by General Administration Department
Mumbai, July 28: The General Administration Department of the Maharashtra government has issued a new set of guidelines regarding the use of social media by government officers and employees. A formal government resolution (GR) outlining these directives has been released.
While social media is recognized as a powerful communication tool in the digital age, the guidelines aim to prevent misuse such as the spread of confidential information, misinformation, or violations of official conduct rules.
As per the circular issued by the department, the Maharashtra Civil Services (Conduct) Rules, 1979 will be applicable to social media use as well. Violation of these rules may attract disciplinary action under the Maharashtra Civil Services (Discipline and Appeal) Rules, 1979.
Key Guidelines:
· These rules apply to all government officers and employees, including those in local self-government institutions, boards, corporations, public sector undertakings, and those appointed on deputation or contract basis.
· Any adverse criticism of current or past policies of the state or central government on social media is strictly prohibited.
· Social media should be used consciously and responsibly.
· Personal and official social media accounts must be maintained separately.
· Employees must not use websites or apps that are banned by the central or state government.
· Only authorized and official channels should be used for disseminating information about government schemes and initiatives.
· Messaging platforms like WhatsApp and Telegram may be used for coordination of official work.
· Posts regarding the success of government schemes are allowed but must avoid self-promotion.
· Government designations, logos, uniforms, or images/videos of government property must not be uploaded on personal accounts.
· Posting or forwarding objectionable, hateful, or discriminatory content is strictly prohibited.
· Confidential documents must not be uploaded without proper authorization.
· Upon transfer, official social media accounts must be properly handed over to the concerned successor.
The government has clarified that violation of these rules will lead to disciplinary action. The objective of these guidelines is to ensure responsible use of social media in the digital era and to uphold the credibility of government institutions.
0000
शासकीय कर्मचारियों के सोशल मीडिया उपयोग पर मार्गदर्शक निर्देश जारी
सामान्य प्रशासन विभाग द्वारा शासन निर्णय निर्गमित
मुंबई, 28 जुलाई: महाराष्ट्र सरकार के सामान्य प्रशासन विभाग ने शासकीय अधिकारियों और कर्मचारियों के लिए सोशल मीडिया के उपयोग संबंधी नए मार्गदर्शक नियम घोषित किए हैं। इस बाबत शासन निर्णय (जीआर) जारी किया गया है।
डिजिटल युग में सोशल मीडिया प्रभावी संवाद का माध्यम है, लेकिन इसके माध्यम से गोपनीय जानकारी का प्रसार, झूठी सूचनाएं फैलाना या शासकीय नियमों का उल्लंघन न हो, इसके लिए ये मार्गदर्शक निर्देश तय किए गए हैं।
विभाग द्वारा जारी परिपत्र के अनुसार, महाराष्ट्र सिविल सेवा (आचरण) नियम, 1979 सोशल मीडिया उपयोग पर भी लागू रहेंगे। इन नियमों का उल्लंघन करने वाले कर्मचारियों पर महाराष्ट्र सिविल सेवा (अनुशासन एवं अपील) नियम, 1979 के अंतर्गत अनुशासनात्मक कार्रवाई की जाएगी।
प्रमुख मार्गदर्शक निर्देश :
ये नियम राज्य सरकार के अधिकारी-कर्मचारी, स्थानीय स्वराज संस्थाएं, मंडल, महामंडल, सार्वजनिक उपक्रम तथा प्रतिनियुक्ति या अनुबंध के आधार पर नियुक्त कर्मचारियों पर भी लागू होंगे।
केंद्र या राज्य सरकार की वर्तमान या पूर्व की नीतियों की सोशल मीडिया पर प्रतिकूल आलोचना करना पूर्णतः प्रतिबंधित है।
सोशल मीडिया का उपयोग सोच-समझकर और जिम्मेदारी से करना चाहिए।
व्यक्तिगत और कार्यालयीन सोशल मीडिया अकाउंट अलग-अलग बनाए रखना अनिवार्य है।
केंद्र या राज्य सरकार द्वारा प्रतिबंधित वेबसाइट या ऐप का उपयोग नहीं करना चाहिए।
शासकीय योजनाओं और उपक्रमों के प्रचार हेतु केवल अधिकृत और प्राधिकृत माध्यमों का उपयोग करें।
कार्यालयीन समन्वय हेतु व्हाट्सऐप, टेलीग्राम जैसे मैसेजिंग प्लेटफॉर्म का उपयोग किया जा सकता है।
शासकीय योजनाओं की सफलता से संबंधित पोस्ट की जा सकती हैं, लेकिन इनमें आत्मप्रशंसा नहीं होनी चाहिए।
व्यक्तिगत अकाउंट पर शासकीय पदनाम, लोगो, गणवेश, शासकीय संपत्ति के फोटो या वीडियो अपलोड नहीं किए जाने चाहिए।
आपत्तिजनक, घृणास्पद या भेदभावकारी सामग्री पोस्ट या फॉरवर्ड करना वर्जित है।
किसी भी गोपनीय दस्तावेज को बिना स्वीकृति सोशल मीडिया पर अपलोड नहीं किया जाना चाहिए।
स्थानांतरण के पश्चात कार्यालयीन सोशल मीडिया अकाउंट को विधिवत हस्तांतरित किया जाना चाहिए।
शासन ने स्पष्ट किया है कि इन नियमों के उल्लंघन पर सख्त अनुशासनात्मक कार्रवाई की जाएगी। इन निर्देशों का उद्देश्य डिजिटल युग में सोशल मीडिया का जिम्मेदारीपूर्वक उपयोग सुनिश्चित करना और शासकीय यंत्रणा की विश्वसनीयता बनाए रखना है।
००००
नागपुर और महाराष्ट्र की बेटी ग्रँडमास्टर दिव्या देशमुख पर गर्व
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्य सरकार करेगी औपचारिक सम्मान
नागपुर, 28 जुलाई: नागपुर और महाराष्ट्र की बेटी, किशोरवयीन शतरंज खिलाड़ी दिव्या देशमुख ने अंतरराष्ट्रीय शतरंज प्रतियोगिता में विश्व विजेता बनकर 'ग्रँडमास्टर' का खिताब हासिल किया है। उनकी यह उपलब्धि अत्यंत गौरव की बात है और राज्य सरकार की ओर से उनका उचित सम्मान किया जाएगा, यह जानकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने दी।
रामगिरी शासकीय निवास पर मीडिया से बातचीत करते हुए मुख्यमंत्री फडणवीस ने कहा कि दिव्या देशमुख ने महिला विश्व शतरंज चैंपियनशिप के फाइनल में भारत की ही प्रसिद्ध ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी को हराकर यह महत्वपूर्ण जीत हासिल की है। कोनेरू हम्पी को बधाई देते हुए उन्होंने बताया कि दिव्या ने इस स्पर्धा में अपने दूसरे प्रयास में यह सफलता पाई है और मात्र 19 वर्ष की आयु में यह ऐतिहासिक उपलब्धि हासिल की है।
अब तक दिव्या देशमुख ने विभिन्न स्पर्धाओं में 23 स्वर्ण पदकों सहित लगभग 35 पदक अपने नाम किए हैं।
मुख्यमंत्री फडणवीस ने कहा कि राज्य सरकार की ओर से दिव्या देशमुख का सम्मान किया जाएगा। इस संबंध में उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार और खेल मंत्री दत्तात्रय भरणे से चर्चा की जाएगी।
००००
Nagpur and Maharashtra’s Pride – Chess Grandmaster Divya Deshmukh Earns Glorious Honour
She will be felicitated by the State Government, says Chief Minister Devendra Fadnavis
Nagpur, July 28: Divya Deshmukh, the young chess prodigy from Nagpur and daughter of Maharashtra, has made the state and the nation proud by clinching the world title in an international chess championship and earning the prestigious ‘Grandmaster’ title at a very young age. Chief Minister Devendra Fadnavis has announced that the Maharashtra Government will officially felicitate her for this remarkable achievement.
Speaking to the media at the Ramgiri government residence in Nagpur, Chief Minister Fadnavis said that Divya Deshmukh defeated renowned Indian Grandmaster Koneru Humpy in the finals of the World Chess Championship to secure this important victory. Congratulating both players, he highlighted that Divya had reached the summit in her second attempt at the championship and achieved this milestone at just 19 years of age.
So far, Divya has won around 35 medals, including 23 gold, across various competitions.
Chief Minister Fadnavis added that the state government will duly honour Divya Deshmukh’s achievement. He also mentioned that discussions would be held in this regard with Deputy Chief Ministers Eknath Shinde and Ajit Pawar, as well as Sports Minister Dattatray Bharne.
0 Response to "नागपूर व महाराष्ट्राची कन्या बुद्धिबळपटू दिव्या देशमुख यांचा सार्थ अभिमान"
Post a Comment