
न्यू. आयु डी. पी.कॉलनी वाशिम येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा..
साप्ताहिक सागर आदित्य
न्यू. आयु डी. पी.कॉलनी वाशिम येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा..
वाशिम :- ज्या ज्या महान स्त्रियांनी मानव जातीच्या कल्यानासाठी महिलांना सक्षम बनवन्याचा मार्ग मिळऊन दिला, संपूर्ण आयुष्य ज्यांनी महिलांच्या उत्थानासाठी व्यतित केले त्या महान स्त्रियांचे स्मरण करून महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरनार्थ आज 8 मार्च हा जागतिक महिला दिवस आयु. डी. पी. कॉलनी येथे उत्साहात साजरा केला, यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून सौ. रेखाताई मापारी यांची उपस्थिती लाभली तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ. सीमाताई राजगुरू व महिला समुपदेशन केंद्राच्या अध्यक्षा सौ. वैशालीताई आरू उपस्थित होत्या, कार्यक्रमाच्या अतिथी सौ. वैशालीताई आरू यांनी महिला दिनाच्या निमित्ताने आपले मनोगत व्यक्त केले, मनोगतातून सांगितले की आज संपूर्ण जग जीने आपल्या कवेत घेतले आहे, अगदी गरुडाची जिद्द मनात बाळगुन सर्व क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे, नारी ही जगत जननी आहे, तिच्याशिवाय या सृष्टीचे चक्र अपूर्ण आहे स्त्रियांनी सर्व क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आहे, ग्रामपंचायत सदस्य पासून तर राष्ट्रपती पदापर्यंत स्त्रियांनी झेप घेतली आहे, स्त्रियांनी अजूनही गुलामा सारखे जीवन न जगता सावित्री चे विचार डोक्यात घेणे गरजेचे आहे, तरच महिलाचे सक्षमीकरण होईल अशा विविध विषयावर सौ. वैशाली ताई आरु यांनी आपले मनोगत व्यक्त केले,
सदर या कार्यक्रमाचे आयोजन सौ. अनिताताई धुमाळे व सौ.माधुरी ताई सोनोने यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ.जयश्री पानझडे यांनी केले, या कार्यक्रमाला उपस्थित सौ. भाग्यश्री पाठक सौ. अश्विनी जयपूरकर,सौ. हेमा इंगळे सौ. मकासरे, सौ. प्रणिता माहुरे, सौ. विद्या पाटील,सौ. मंदा खोडके, सौ. सरनाईक, सौ. जोगदंड, इडोळे, सौ. सुर्वे, सौ. वाकळे, सौ.खुळे,सौ. देशमुख, सौ. जाधव, सौ. सोनू सौ. गणेश पुरे ह्या महिला उपस्थित होत्या, स्त्री विचाराचा जागर करत सावित्रीबाईस अभिवादन करून कार्यक्रम संपन्न झाला, यावेळी आयु. डी. कॉलनी येथील मोठया प्रमाणात महिला उपस्थित होत्या..
0 Response to "न्यू. आयु डी. पी.कॉलनी वाशिम येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा.."
Post a Comment