जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम राष्ट्रीय अंधत्व नियंत्रन कार्यक्रम
साप्ताहिक सागर आदित्य
जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम राष्ट्रीय अंधत्व नियंत्रन कार्यक्रम
डॉक्टर दिनानिमीत्त वाशिम जिल्हयातील डॉक्टरांनी केला मरनोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प
बंगालचे माजी मुख्यमंत्री डॉ. विधानचंद्र रॉय यांच्या स्मरनार्थ १ जुलै १९९१ रोजी भारतात प्रथमच राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा करण्यात आला. मानवतेच्या सेवेत त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. डॉ. रॉय हे उत्तम डॉक्टर होते. त्यांनी १४ वर्ष पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणुनही काम केले. त्यांचा सन्मान करण्यासाठी त्यांच्या वाढदिवसा निमीत्ताने म्हनजे १ जुलै रोजी डॉक्टर्स दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे १ जुलै हा दिवस राष्ट्रीय डॉक्टर दिवस म्हनुन साजरा केला जातो. दैनदिन जीवनात मानसिक आणी शारीरीकदृष्ट्या तंदरुस्त राहण्यासाठी डॉक्टरांकडुन अनेक सल्ले दिले जातात. कोरोना महामारीच्या काळात तर डॉक्टर आपल्यासाठी देवदुत ठरले होते. स्वतःचा जीव धोक्यात घालुन आणी प्रतिकुल परिस्थीतीत आपल्या रुग्णाचा जीव कसा वाचविण्याचा प्रयत्न करतो हे सर्वांनी पाहीले. प्रत्येक डॉक्टर आपल्या रुग्णांना सर्वोत्तम आरोग्यसेवा पुरवतो. कोविड १९ नंतर डॉक्टरांचे महत्व शब्दात मांडता येणार नाही. मरनासन्न रुग्णाला नवजिवन देणा-या डॉक्टरांच्या भुमीका आणी जबाबदा-यांकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला जातो. कोविड काळात डॉक्टर आणी त्यांचे सहकारी १० ते १५ दिवस सतत रुग्णालयात राहुन जीव धोक्यात घालुन रुग्णांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या जिवाची पर्वा न करता जगातील डॉक्टरांनी ज्या भावनेने आणी समर्पणाने रुग्णांची सेवा केली, त्यासाठी रुग्णांनी त्यांना देवाच्या ठिकाणी ठेवुन त्यांची पुजा केली तरी कमीच आहे. इतकेच नाही तर आज डॉक्टर्स दिना निमीत्त वाशिम जिल्ह्यातील सर्व डॉक्टर्स यांनी रुग्णांसाठी मरनोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प केला आहे. जेने करुण अंधांना दृष्टी प्राप्त होन पुन्हा एकदा आपल्या पुथ्विवरील सौंदर्य त्यांना पहायला मिळेले. तसेच जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अनिल कावरखे व अतिरीक्त जिल्हा शल्य डॉ. अविनाश पुरी यांनी वाशिम जिल्हयातील जनतेला आवाहन केले की मरनोत्तर नेत्रदान करावे व त्यानंतरच मृतावर अंत्यसंस्कार करावे.
0 Response to "जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम राष्ट्रीय अंधत्व नियंत्रन कार्यक्रम"
Post a Comment