-->

एन. एच. च्या प्रोजेक्ट डायरेक्टर यांचेकडून सर्विस रोड देण्याबाबतचे लेखी आश्वासन दिले मुळे साखळी उपोषण तात्पुरते स्थगित.

एन. एच. च्या प्रोजेक्ट डायरेक्टर यांचेकडून सर्विस रोड देण्याबाबतचे लेखी आश्वासन दिले मुळे साखळी उपोषण तात्पुरते स्थगित.

 


साप्ताहिक सागर आदित्य 

एन. एच. च्या प्रोजेक्ट डायरेक्टर यांचेकडून सर्विस रोड देण्याबाबतचे लेखी आश्वासन दिले मुळे साखळी उपोषण तात्पुरते स्थगित.


भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रोजेक्ट डायरेक्टर, मा. एस. एस. कदम साहेब व फलटणचे प्रांताधिकारी मा. सचिन ढोले साहेब यांच्या लेखी आदेशाने चौधरवाडी येथील होळकरवस्ती, पाचमोरी मधील सर्वे नंबर ३६ व ३६ ब मधील उपोषणकर्त्या सर्व शेतकऱ्यांना अश्वस्थ करण्यात आले आहे की, या शेतकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गाने शेतात ये-जा करण्यासाठीचा रस्ता कायमचा बंद केला होता, तो भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने चालू असलेल्या पूलाला ३ मीटर रुंदीचा कायमचा सर्विस रोड तयार करून देत आहोत.हे मान्य केल्यामुळे दिनांक ०९/१२/२०२३ रोजी उपोषण करते सर्व शेतकरी साखळी उपोषणाच्या सहाव्या दिवशी उपोषण सोडत आहेत. तसेच त्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे सर्व अर्जदार सह्या करणाऱ्या शेतकऱ्यांनी हेही जाहीर केले आहे की, आत्ता कागदावर आम्हाला रस्ता देत असल्याचे आश्वासन दिले आहे ,जर प्रत्यक्षात आम्हाला ३ मीटरचा सर्व्हिस रोड मिळाला नाही तर, आम्ही उपोषण करते सर्व शेतकरी हे आमरण उपोषणाला मा. प्रांत साहेब यांच्या कार्याला बाहेर बसणार आहोत याची सर्व मान्यवरांनी नोंद घ्यावी व आम्हाला कबूल केल्याप्रमाणे ३ मीटरचा सर्विस रोड देण्यात यावा. अशी ही माहिती शेतकरी व ॲड. कांचनकन्होजाताई धोंडीराम खरात यांनी दिली आहे.

Related Posts

0 Response to "एन. एच. च्या प्रोजेक्ट डायरेक्टर यांचेकडून सर्विस रोड देण्याबाबतचे लेखी आश्वासन दिले मुळे साखळी उपोषण तात्पुरते स्थगित."

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article