
न्या.नाशिककर यांनी मध्यस्थी प्रक्रीयेबाबत उपस्थितांना माहिती देवून वाद व तंटे मध्यस्थीच्या माध्यमातून मिटविण्याचे आवाहन केले.
साप्ताहिक सागर आदित्य
जिल्हा न्यायालयात मध्यस्थीबाबत केले मार्गदर्शन
वाशिम, : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधीज्ञ संघ यांच्या वतीने 30 ऑक्टोबर रोजी जिल्हा न्यायाधीश व्ही.व्ही.नाशिककर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा न्यायालय कक्ष क्र.13 मध्ये मध्यस्थी संबंधित जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
न्या.नाशिककर यांनी मध्यस्थी प्रक्रीयेबाबत उपस्थितांना माहिती देवून वाद व तंटे मध्यस्थीच्या माध्यमातून मिटविण्याचे आवाहन केले.
दिवाणी न्यायाधीश आर.पी. कुलकर्णी यांनी प्री-इंस्टीटयुशन मिडीएशन ॲन्ड सेटलमेंट इन कमर्शियल डिसपुट या विषयावर मार्गदर्शन करतांना मध्यस्थी प्रक्रीयेतील विविध टप्प्यांबाबत माहिती देवून मध्यस्थीबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार मुख्य लोक अभिरक्षक परमेश्वर शेळके यांनी मानले. कार्यक्रमाला न्या.एस.एस. घोरपडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व्ही.ए. टेकवाणी, सर्व न्यायीक अधिकारी, लोक अभिरक्षक, जिल्हा विधीज्ञ संघाचे सदस्य, विधीज्ञ, पक्षकार व न्यायालयीन कर्मचारी यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
0 Response to "न्या.नाशिककर यांनी मध्यस्थी प्रक्रीयेबाबत उपस्थितांना माहिती देवून वाद व तंटे मध्यस्थीच्या माध्यमातून मिटविण्याचे आवाहन केले."
Post a Comment