
जुमडा येथे नवदुर्गा मंडळाकडून घटस्थापना अमोल शिंदे यंना सपत्नीक आरती व पूजेचा मान
साप्ताहिक सागर आदित्य
जुमडा येथे नवदुर्गा मंडळाकडून घटस्थापना
अमोल शिंदे यंना सपत्नीक आरती व पूजेचा मान
वाशिम - वाशिम तालुक्यातील जुमडा येथे रविवारी (दि.१५) घटस्थापनेच्या मुहूर्तावर नवदुर्गा मंडळाच्यावतीने घटस्थापना करण्यात आली. नवदुर्गा मंडळाच्यावतीने वाशिम जिल्हा काँग्रेस कमिटी, ओबीसी विभागाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांना सपत्नीक नवदुर्गा मातेची पूजा व आरतीचा मान दिला.
वाशिम तालुक्यातील जुमडा येथे मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव साजरा केला जातो. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गावात घटस्थापनेच्या मुहूर्तावर भक्तीभावाने नवदुर्गा मंडळाकडून घटस्थापना करीत नवदुर्गा मातेची स्थापना करण्यात आली. नवदुर्गा मंडळाकडून वाशिम जिल्हा काँग्रेस कमिटी, ओबीसी विभागाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे व अश्विनी अमोल शिंदे यांना दुर्गामातेची पूजा व आरतीचा मान मिळाला. यावेळी प्रांजल अमोल शिंदे, सरपंच संदीप शिंदे, सेवा सहकारी सोसायटी माजी उपाध्यक्ष तुळशीराम शिंदे, आत्माराम शिंदे, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष दगडू शिंदे, माजी सरपंच चंद्रकांत शिंदे, शिक्षक दिगंबर शिंदे, जनार्दन मारुती शिंदे, कैलास शिंदे, हरिभाऊ शिंदे, गजानन शिंदे, केशव नागोजी शिंदे, शालीक शिंदे, नथुराम शिंदे, माधव शिंदे, दिनकर शिंदे, नाथा शिंदे, माजी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष श्रीराम शिंदे, विनोद भाऊ, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष शालीक शिंदे यांच्यासह नवदुर्गा उत्सव मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, गावकरी मंडळी, महिला भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
0 Response to "जुमडा येथे नवदुर्गा मंडळाकडून घटस्थापना अमोल शिंदे यंना सपत्नीक आरती व पूजेचा मान"
Post a Comment