
राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळ 31 ऑक्टोबरपूर्वी कर्जासाठी ऑनलाईन अर्ज मागविले
राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळ
31 ऑक्टोबरपूर्वी कर्जासाठी ऑनलाईन अर्ज मागविले
वाशिम, : राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळ,नवी दिल्ली कर्ज योजनेअंतर्गत जिल्हयाकरीता 83 कर्ज प्रकरणांचे उदिष्ट प्राप्त झाले आहे. यासाठी 3 कोटी 70 लक्ष रुपये प्राप्त आहे. इच्छुक पात्र अर्जदारांनी कर्ज मागणी अर्ज ऑनलाईन पध्दतीने https://mpbcdc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर 31 ऑक्टोबरपर्यंत स्विकारण्यात येणार आहे. 31 ऑक्टोबरनंतर ऑनलाईन कर्ज प्रकरणे स्विकारण्याचे पोर्टल बंद होणार आहे. त्यानंतर येणारे कर्ज मागणीचे अर्ज स्विकारण्यात येणार नाही. तरी इच्छुक अर्जदारांनी 31 ऑक्टोबरपूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करावे. असे आवाहन महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सुरेंद्र यावलीकर यांनी केले आहे.
0 Response to "राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळ 31 ऑक्टोबरपूर्वी कर्जासाठी ऑनलाईन अर्ज मागविले"
Post a Comment