-->

श्रीमती बुवनेश्वरी एस.यांनी जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली

श्रीमती बुवनेश्वरी एस.यांनी जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली

 


साप्ताहिक सागर आदित्य 

श्रीमती बुवनेश्वरी एस.यांनी जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली 

 

वाशिम  श्रीमती बुवनेश्वरी एस.यांनी आज २४ जुलै रोजी जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्विकारली.जिल्हाधिकारी श्री. षण्मुगराजन एस.यांची राज्य शासनाने मुंबई येथे अतिरिक्त विकास आयुक्त (उद्योग) या पदावर बदली केल्याने श्रीमती बुवनेश्वरी एस.यांची वाशिम जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केली. 

        भारतीय प्रशासकीय सेवेतील सन २०१५ च्या तुकडीतील अधिकारी असलेल्या श्रीमती बुवनेश्वरी ह्या तामिळनाडू राज्यातील मद्रास येथील रहिवासी आहेत.त्यांनी संगणक विज्ञानात पदव्युत्तर पदवी घेतली आहे.यापूर्वी त्यांनी परिविक्षा कालावधीत कोल्हापूर येथे सहायक जिल्हाधिकारी,यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे उपविभागीय अधिकारी म्हणून काम केले आहे. नाशिक व भंडारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी,नागपूर येथे स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी,नागपूर येथील वनामतीच्या महासंचालक आणि वाशिम येथे रुजू होण्यापूर्वी त्या धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या.जिल्ह्यात आरोग्य व शिक्षणाकडे विशेष लक्ष देणार असून जिल्ह्यातील प्राधान्यक्रम लक्षात घेऊन कामे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Posts

0 Response to "श्रीमती बुवनेश्वरी एस.यांनी जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article