
कोतवाल पदभरती : आर्थिक देवाण - घेवाण करु नये " उप विभागीय अधिकारी वाशिम यांचे आवाहन
साप्ताहिक सागर आदित्य
कोतवाल पदभरती : आर्थिक देवाण - घेवाण करु नये " उप विभागीय अधिकारी वाशिम यांचे आवाहन जिल्हयातील तहसिल कार्यालय , वाशिम , रिसोड , व मालेगांव अंतर्गत येणाऱ्या कार्यक्षेत्राकरीता उप विभागीय अधिकारी , वाशिम यांचे अध्यक्षतेखाली कोतवाल पदभरती -२०२३ ची प्रक्रिया सुरु आहे . ही कोतवाल पदभरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पध्दतीने करण्यात येत आहे . या पदभरती संदर्भात कोणत्याही अपप्रचाराला बळी पडून कोणीही कोणत्याही प्रकारची आर्थिक देवाण - घेवाण करु नये तसेच असा अपप्रचार करणाऱ्या व्यक्तींना समर्थन करु नये . जिल्हयातील वाशिम उप विभागातील वाशिम , रिसोड , व मालेगांव तालुक्यातील कोतवाल पदभरतीची प्रक्रिया अत्यंत पारदर्शीपणे पुर्ण करण्यासाठी सहकार्य करावे . असे आवाहन श्रीमती . वैशाली देवकर , उप विभागीय अधिकारी , वाशिम यांनी केले आहे . उप विभागीय अधिकारी उपविभागीय अधिकारी
0 Response to "कोतवाल पदभरती : आर्थिक देवाण - घेवाण करु नये " उप विभागीय अधिकारी वाशिम यांचे आवाहन "
Post a Comment