-->

भारताची अवकाश संशोधन क्षेत्रातील ऐतिहासिक झेप - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

भारताची अवकाश संशोधन क्षेत्रातील ऐतिहासिक झेप - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 


साप्ताहिक सागर आदित्य 

मुख्यमंत्री सचिवालय 

भारताची अवकाश संशोधन क्षेत्रातील ऐतिहासिक झेप - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

चांद्रयान-३ च्या यशस्वी प्रक्षेपणासाठी वैज्ञानिकांचे अभिनंदन

मुंबई, दि. 14:- ‘चांद्रयान-3  मोहिम भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रातील ऐतिहासिक झेप ठरेल,’असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रयान-3 च्या यशस्वी प्रक्षेपणासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या वैज्ञानिक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.


शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, ‘चांद्रयान ही मोहिम भारताच्या अवकाश संशोधन क्षेत्रातील जिद्द आणि चिकाटीचे प्रतिक आहे. आपल्या वैज्ञानिकांनी या क्षेत्रात देखील भारत अग्रेसर असल्याचे सिद्ध केले आहे. चांद्रयान मोहिम भारतच नव्हे, तर जगासाठी महत्वपूर्ण अशी आहे. यातून पुढे अनेक वैज्ञानिक, संशोधन प्रकल्पांना चालना मिळेल, असा विश्वास आहे. या मोहिमेसाठी भारत सरकारने आपल्या वैज्ञानिकांना सातत्यपूर्ण असे पाठबळ आणि प्रोत्साहन दिले आहे. आपल्या तरूण वैज्ञानिकांसाठी हा क्षण प्रेरणादायी आहे.  भारतीयांच्या अवकाशातील या कामगिरीची जगाच्या इतिहासात गौरवाने नोंद होईल, हे आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे,असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे.



Related Posts

0 Response to "भारताची अवकाश संशोधन क्षेत्रातील ऐतिहासिक झेप - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article