-->

45 हजार हेक्टरवरील शेतपीक बाधित  पावसाने खरडून गेले 1750 हेक्टर क्षेत्र

45 हजार हेक्टरवरील शेतपीक बाधित पावसाने खरडून गेले 1750 हेक्टर क्षेत्र

 


साप्ताहिक सागर आदित्य 

45 हजार हेक्टरवरील शेतपीक बाधित

पावसाने खरडून गेले 1750 हेक्टर क्षेत्र

        वाशिम,  : जिल्हयात 5 जुलै ते 22 जुलै या कालावधीत झालेल्या पावसामुळे 45 हजार 874.38 हेक्टर शेतपिकाचे क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. 5 जुलै रोजी कारंजा तालुक्यातील येवता मंडळातील 2 हेक्टरवरील कपाशी व सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. 12 जुलै रोजी कारंजा तालुक्यातील येवता व उंबर्डा (बाजार) महसूल मंडळातील 36 हेक्टरवरील कपाशी, तूर व सोयाबीन पीक, 14 ते 16 जुलै दरम्यान मानोरा तालुक्यातील इंझोरी मंडळातील 111 हेक्टरवरील आणि मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी (ताड) मंडळातील 340 हेक्टरवरील कपाशी, तूर व सोयाबीनचे, 18 जुलै रोजी कारंजा तालुक्यातील खेर्डा (बु.) व पोहा मंडळातील 4 हजार 311 हेक्टरवरील सोयाबीन, तूर, कपाशी, उडीद व मुंग व मंगरुळपीर मंडळातील 1 हजार 463 हेक्टरवरील सोयाबीन व तूर, 19 जुलै रोजी कारंजा मंडळातील 335.5 हेक्टरवरील कपाशी, तूर व सोयाबीन आणि मालेगांव तालुक्यातील वाडी रामराव व पिंपळशेंडा मंडळातील 45 हेक्टरवरील सोयाबीन व तूर पिकाचे नुकसान झाले.


           20 जुलै रोजी मालेगांव तालुक्यातील किन्हीराजा मंडळातील 60 हेक्टरवरील सोयाबीन व तूर आणि 22 जुलै रोजी मानोरा तालुक्यातील मानोरा, इंझोरी, शेंदूर्जना, कुपटा, गिरोली व उमरी (बु.) मंडळातील 15 हजार 295.88 हेक्टरवरील सोयाबीन, तूर, कपाशी, उडीद व मुंग आणि कारंजा तालुक्यातील पोहा, धनज (बु.), कामरगाव, हिवरा (लाहे) व येवता मंडळातील 23 हजार 875 हेक्टरवरील सोयाबीन, तूर, कपाशी, उडीद व मुंग पिकांचे पावसाने बाधित होवून नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे 16 जुलै रोजी मालेगांव तालुक्यातील 5.3 हेक्टर, 18 जुलै रोजी कारंजा तालुक्यातील खेर्डा (बु.) व पोहा मंडळातील 13.8 हेक्टर आणि 22 जुलै रोजी मानोरा तालुक्यातील मानोरा, इंझोरी, शेंदुर्जना, कुपटा, गिरोली व उमरी (बु.) या मंडळातील 1750.3 हेक्टर अशी एकूण 1769.4 हेक्टर जमीन खरडून गेली.     



Related Posts

0 Response to "45 हजार हेक्टरवरील शेतपीक बाधित पावसाने खरडून गेले 1750 हेक्टर क्षेत्र"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article