
सुकळीत दिली समाज कल्याण योजनांची माहिती
साप्ताहिक सागर आदित्य
सुकळीत दिली समाज कल्याण योजनांची माहिती
वाशिम, सामाजिक न्याय पर्वाच्या निमित्ताने वाशिम तालुक्यातील सुकळी येथे २१ एप्रिल रोजी समाज कल्याण विभागाच्या योजनांची माहिती जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाचे नारायण बर्डे यांनी उपस्थित ग्रामस्थांना दिली.यामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना, दिव्यांग बीज भांडवल योजना, दिव्यांग-अव्यंग विवाह योजना, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना,आंतरजातीय विवाह योजना, जिल्हा परिषद सेस फंड योजना, वृध्दांकरीता वृध्दाश्रम योजना, अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्ती विकास योजना यासह अन्य योजनांची माहिती दिली.यावेळी जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या समाज कल्याणच्या योजनांवर आधारीत समर्पण या घडीपुस्तिकेचे,योजनांच्या एल.डी. फोमशीट बॅनरचे व समता दिनदर्शिकेचे वितरण करण्यात आले.यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Response to "सुकळीत दिली समाज कल्याण योजनांची माहिती"
Post a Comment