
दि. 17 व 18 एप्रिल ला वाशिम येथे लेसर मशिनद्वारे मुळव्याध भगंदर उपचार शिबिर
साप्ताहिक सागर आदित्य
दि. 17 व 18 एप्रिल ला वाशिम येथे लेसर मशिनद्वारे मुळव्याध भगंदर उपचार शिबिर
डाँ. घुगे यांचे वरद हाँस्पिटल वाशिम व
डाँ राजेश दळवे यांचे मुळव्याध आयुर्वेद हाँस्पिटल मालेगाव द्वारा आयोजन
दि. 17 व 18 एप्रिल 2023 रोजी स्थानिक पुसद नाका ,वाशिम येथील डाँ घुगे यांचे वरद हॉस्पिटल येथे निशुल्क मूळव्याध, भगंदर, फिशर यावर निदान व लेझर द्वारे उपचार शिबिर आयोजित केले आहे.
लेझार उपचाराचे फायदे :
विना रक्तस्त्राव कमीत कमी वेदना विना जखम विना कापाकापी विना टाक्याचे संडासाचे नियंत्रण जाण्याचा धोका नाही रोजची कामे लगेच करु शकता अल्पशा छिंद्राव्दारे करण्यात येणारी लवकर जख्म भरून आराम देणारी
या शिबिरामध्ये मुळव्याध , भगंदर , फिशर , पायलोनिडल सायनस(माकड हाडाच्या ठिकाणी फोड व त्यातुन तुरुंब पाणी पु येणे) ई.आजाराची तपासणी करुन सवलतीच्या दरात लेसर व क्षारसुत् द्वारे उपचार करण्यात येतील.
या शिबिरामध्ये गुदमार्गाच्या ठिकाणी जळजळ व वेदना होणे, गूदमार्गाव्दारे रक्तस्त्राव होणे, कोंब किंवा कड बाहेर येणे, गुदमार्गाच्या बाजूला फोड किंवा गाठ येवून त्यातून पूय व रक्तस्त्राव होणे, शौचास साफ न होणे आदी लक्षणे असणाऱ्या रुग्णांना शिबिराचा लाभ घ्यावा. तसेच शिबिराकरिता डाँ. चंद्रकांत घुगे यांचे वरद हॉस्पिटल, पुसद नाका वाशिम येथे नोंदणी शिबिरामध्ये करण्याचे आवाहन आयोजका तर्फे करण्यात आले.
0 Response to "दि. 17 व 18 एप्रिल ला वाशिम येथे लेसर मशिनद्वारे मुळव्याध भगंदर उपचार शिबिर "
Post a Comment