-->

13 मार्च ज्वारी शेती दिनानिमित्त कार्यक्रम  शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे

13 मार्च ज्वारी शेती दिनानिमित्त कार्यक्रम शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे

 


साप्ताहिक सागर आदित्य 

13 मार्च ज्वारी शेती दिनानिमित्त कार्यक्रम

शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे

       वाशिम,  : प्रादेशिक कृषि संशोधन केंद्र, वाशिम या प्रक्षेत्रावर आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृनधान्य वर्ष २०२३ च्या अनुषंगाने रब्बी हंगामात ज्वारीने विविध २५ हजार जनुकीय वाणाची लागवड केली आहे. एकाच ठिकाणी विविध प्रकारचे २५ हजार ज्वारीचे वाण पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे. हा प्रकल्प संपूर्ण भारतामधून एकमेव वाशिम येथे असून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठ, अकोलाचे कुलगुरु डॉ. गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. भरत गीते यांनी व्यवस्थापन केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून १३ मार्च २०२३ रोजी सकाळी 10 वाजता ज्वारी शेती दिनाचे प्रक्षेत्रावर आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना शिवार फेरीसह ज्वारी पिकाबाबत तज्ञाचे मार्गदर्शन लाभणार आहे.

           कार्यक्रमाला प्रधान सचिव (कृषि) एकनाथजी डवले, आयुक्त (कृषि) सुनील चव्हाण, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाचे कुलगुरु शंकरराव गडाख व अमरावतीचे विभागीय कृषि सहसंचालक किसन मुळे यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे. तरी जिल्हयातील शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने कार्यक्रमास उपस्थित राहावे. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, वाशिम यांनी केले आहे.


Related Posts

0 Response to "13 मार्च ज्वारी शेती दिनानिमित्त कार्यक्रम शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article