-->

क्षयरुग्णांना मिळणार सामुदायि‍क सहाय्य  क्षयरोग विभागाचा पुढाकार

क्षयरुग्णांना मिळणार सामुदायि‍क सहाय्य क्षयरोग विभागाचा पुढाकार

 


साप्ताहिक सागर आदित्य 

क्षयरुग्णांना मिळणार सामुदायि‍क सहाय्य

क्षयरोग विभागाचा पुढाकार

वाशिम, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय धोरणात्मक योजनेअंतर्गत २०२५ पर्यन्त क्षयरोग मुक्त भारताच्या उद्दिष्टपूर्तीसाठी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने समाजातील विविध स्तरावर काम करणाऱ्या संस्था आणि व्यक्तिसोबत समन्वय साधण्यात येत आहे.केंद्रीय क्षयरोग विभागाने 

" क्षयरुग्णांना सामुदायिक सहाय्य " 

हा उपक्रम सुरू केला आहे.

           या उपक्रमाअंतर्गत टीबी रुग्णांचे उपचार यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी उपचाराखालील रुग्णास अतिरिक्त मदत करणे, २०२५ पर्यंत 

" क्षयरोग मुक्त भारत " उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी समाजिक सहभाग वाढविणे,कंपन्यांच्या व सार्वजनिक क्षेत्राच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातुन उपचाराखालील रुग्णास अतिरिक्त मदत करण्यात येणार आहे.या कार्यक्रमामुळे क्षयरोग दुरिकरणाच्या प्रयत्नांमध्ये व्यक्ति/सामाजिक संस्थाचा सहभाग वाढण्यास मदत होईल.

       क्षयरोगाशी संबंधित समाजातील भीती जनजागृतीद्वारे कमी होण्यास मदत होईल.उपचाराखालील क्षयरुग्णांना पोषण आहार पुरवठा करण्यात येईल.या उपक्रमाअंतर्गत गैरसरकारी संस्था,व्यक्ति, संस्था (सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही) उद्योग संघटना, कॉर्पोरेट्स आणि भागीदार यांच्या सोबत "क्षयरोग मुक्त भारत" उद्दिष्टपुर्ण करण्याच्या अनुषंगाने समन्वय साधण्यासाठी जिल्हा क्षयरोग कार्यालयाच्या वतीने यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. या यंत्रणेद्वारे तालुका/ जिल्हा अंतर्गत उपचाराखालील क्षयरुग्णांना किमान एक वर्षासाठी दत्तक घेऊन रुग्णांना पोषण सहाय्य,व्यावसायिक समर्थन, निदानात्मक सहाय्याद्वारे मदत प्रदान करणे अपेक्षित आहे.

        तरी या मोहिमेमध्ये नागरिकांनी आपल्या तालुक्यातील किंवा कार्यक्षेत्रातील क्षयरुग्णांना सहाय्यता म्हणून वरिल बाबीसाठी सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी यांनी केले आहे. या कामी सहभाग नोंदविण्यासाठी जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालयास प्रत्यक्ष भेट देवून अथवा dtomhwsm@rntcp.org या ई-मेल आयडीद्वारे निक्षयमित्र म्हणून संपर्क साधता येईल.

             राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमाला सहकार्य करून एकजुटिने हातभार लावावा." टी बी हारेल देश जिंकेल " असे आवाहन जिल्हा क्षयरोग केंद्र,वाशिमच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Posts

0 Response to "क्षयरुग्णांना मिळणार सामुदायि‍क सहाय्य क्षयरोग विभागाचा पुढाकार"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article