केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते मोरया ब्लड डोनर ग्रुप सन्मानित
साप्ताहिक सागर आदित्य
केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते मोरया ब्लड डोनर ग्रुप सन्मानित
उत्कृष्ट रक्तसेवक पुरस्कार : रक्तदान जनजागृतीचे उल्लेखनिय कार्य
वाशिम - गेल्या अनेक वर्षापूसन रक्तदानसेवा व जनजागृती चळवळीमध्ये करत असलेल्या उल्लेखनिय कार्याची दखल घेवून केंद्रीय परिवहन मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते मोरया बहूउद्देशिय संस्था व्दारा संचालीत मोरया ब्लड डोनर ग्रुपचा उत्कृष्ट रक्तसेवक पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य परिट-धोबी सर्व भाषिक महासंघाच्या वतीने ५ ऑगष्ट रोजी नागपूर येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते मोरया ब्लड डोनर ग्रुपचे अध्यक्ष महेेश धोंगडे व इतर पदाधिकार्यांचा पुरस्कार देवून सत्कार करण्यात आला. यावेळी ना. गडकरी यांनी मोरया ग्रुपच्या कार्याचे कौतूक करत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. यासोबतच समाजभुषण पुरस्कारप्राप्त डी.डी.सोनटक्के यांनी सुध्दा पदाधिकार्यांचे कौतूक केले. कार्यक्रमाला राजु धोंगडे यांची उपस्थिती होती. याआधी मोरया ब्लड डोनर ग्रुपचा महाराष्ट्र शासनाच्या राज्य रक्तसंक्रमण परिषदेच्या वतीने राज्याचे आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता.
सहा वर्षापुर्वी महेश धोंगडे व इतर समयुवा युवकांनी रक्तदान व जनजागृतीचा उदात्त हेतू समोर ठेवून या संस्थेची स्थापना केली होती. या माध्यमातून अनेक शिबीरे घेवून संस्थेमधील युवकांनी स्वत: अनेकवेळा रक्तदान केले. तसेच अडचणीच्या वेळेस वृत्तपत्रे व सोशल मिडीयाच्या माध्यमातून इतर रक्तदात्यांना आवाहन करुन त्यांना रक्तदानासाठी प्रोत्साहीत केले. सहा वर्षापुर्वी रक्तदानाचे लावलेले रोपटे आता डेरेदार वटवृक्षात रुपांतरीत झाले असून या चळवळीतुन गेल्या सहा वर्षात महाराष्ट्रातील जवळपास ७ हजार गरजु रुग्णांना रक्ताचा पुरवठा करण्यात आला आहे. रक्तदानाच्या या महान कार्याबद्दल मोरया ब्लड डोनर ग्रुपचा अनेक स्वयंसेवी संस्था, संघटनांनी सत्कार करुन त्यांना या कार्यासाठी प्रोत्साहीत केले आहे. रक्तदानाच्या या कार्याची थेट शासनाने दखल घेेवून संस्थेचा सत्कार केल्यामुळे संस्था पदाधिकार्यांचा उत्साह व्दिगुणीत झाला आहे. रक्तदान हे पवित्र कार्य असून रक्तदानाने कुणाचा जिव वाचू शकतो या भावनेतून आपण अधिक जोमाने रक्तदानाची चळवळ राबवु असे मत संस्था अध्यक्ष महेश धोंगडे, मार्गदर्शक योगेश लोनसुने, उपाध्यक्ष अक्षय हजारे, नारायण व्यास, श्याम खोले पाटील, निलेश खोरणे, अक्षय धोंगडे, अनिल दरने, गणेश धोंगडे, आनंद भावसार, अजय तोडकर, रवी धोंगडे, नाना देशमुख, स्वप्निल विटोकार कोळी, मनोज चौधरी, राम लांडगे, गोपाल इकडे, ऋषिकेश अंभोरे, शुभम शेळके, श्याम खोले, आकाश चव्हाण, निखिल देव, विकी गायकवाड, महेश कदम, गजानन धोंगडे, विलास धोंगडे, दिनेश भिमटे यांनी व्यक्त केला आहे.
0 Response to "केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते मोरया ब्लड डोनर ग्रुप सन्मानित"
Post a Comment