जिल्हा परिषद वाशिम, उमेद अंतर्गत राष्ट्रध्वज विक्री केंद्र उद्घाटन
साप्ताहिक सागर आदित्य
वाशिम
जिल्हा परिषद वाशिम, उमेद अंतर्गत राष्ट्रध्वज विक्री केंद्र उद्घाटन
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रध्वज विक्री केंद्र हे उमेद अंतर्गत बचत गटामार्फत जिल्हा परिषद वाशिम इमारतीत सुरू करण्यात आले.
सदर विक्री केंद्राचे उद्घाटन श्रीमती वसूमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, वाशिम यांचे हस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी डॉक्टर विनोद वानखेडे, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा तसेच विवेक बोंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, दिगांबर लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तसेच सर्व विभाग प्रमुख हजर होते.
बचत गटामार्फत राष्ट्रध्वजांची विक्री करण्यात येणार असून ग्रामीण भागातील लोकांना दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत प्रत्येकाने घरावर झेंडा लावण्याबाबत प्रवृत्त करण्यात येणार आहे.
उमेद अंतर्गत ग्रामीण भागातील महिला बचत गटांमार्फत "हर घर तिरंगा " अभियान यशस्वी करण्याकरिता प्रयत्न करण्यात यावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वसूमना पंत यांनी केले .
0 Response to "जिल्हा परिषद वाशिम, उमेद अंतर्गत राष्ट्रध्वज विक्री केंद्र उद्घाटन"
Post a Comment