सुयोग अर्बन निधी ली . बॅक शाखा वाशिम मध्ये उत्कृष्ठ काम केले त्या करीता त्यांना पारीतोषीक देउन त्यांचा सत्कार
साप्तहिक सागर आदित्य/
वाशिम - दि.२१.०८.२०२२ रोजी सुयोग अर्बन निधी ली . बैंक शाखा वाशिम चे सेल्स इक्सीकीटीव्ह , कर्मचारी व अधिकारी यांचा उत्कृष्ठ म्हणुन गौरव करण्यात आला व त्यांनी जे उत्कृष्ठ काम केले त्या करीता त्यांना पारीतोषीक देउन त्यांचा सत्कार करण्यात आला. सुयोग अर्बन निधी ली . बॅक शाखा वाशिम या बँकेचा उददेश ग्रामीण भागातील जनते पर्यंत पोहचविणे तसेच जे शेतकरी बांधव यांना बँकेमध्ये जाने शक्य नाही असे शेतकरी बांधव , मजुर वर्ग , महीला व मुली ज्यांना आज रोजी कुठेही जाणे शक्य होत नाही व शहरी भागात येवून वेळ वाया घालवून त्यांना अडचणीचे होत आहे , त्यामुळे फक्त एकाच कॉलवर बँकेची सेवा घरापर्यंत पोहचविण्याचा ध्येय असल्याचे मुख्य संचालक यांनी या बाबत ग्वाही देवून त्याचे मनोगत व्यक्त केले . आजच्या पारीतोषीक संभारंभामध्ये सर्व अधिकारी व कर्मचारी व सेल्स एक्सीकीटीव्ह यांनी या बाबत सहमती दर्शवत सुयोग अर्बन बँकेचे संचालक मंडळ जे ही निर्णय घेतील त्याकरीता आम्ही कार्य करण्यास कटीवध्द आहोत या बाबत सर्वांनी सहमती दर्शवुन सहकार्य करण्याचे आश्वासित केले . आजच्या कार्यक्रमास मुख्य संचालक सु.अ.नि.लि. , संचालक मंडळ , मुख्य कार्यकारी अधिकारी सु .अ.नि.ली. , जनरल मॅनेजर व ईतर कर्मचारी वर्ग हे या कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान योगेश वाळले अध्यक्ष जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या जि.वाशिम यांनी स्विकारुन सर्वांचे अभिनंदन करत कार्यक्रमास उपस्थिती दर्शविल्याबददल सुयोग अर्बन निधी लि.च्या वतीने जनरल मॅनेजर व मुख्य कार्यकारी अधिकारी सुयोग अर्बन निधी लि.बँक च्या वतीने सर्वांचे आभार मानले .
0 Response to "सुयोग अर्बन निधी ली . बॅक शाखा वाशिम मध्ये उत्कृष्ठ काम केले त्या करीता त्यांना पारीतोषीक देउन त्यांचा सत्कार"
Post a Comment