
देशातली पहिली सायकल स्कॉट जीनियस 910 तब्बल 5 लाख 50 हजार रुपये किमतीची वाशिम येथे उपलब्ध
साप्ताहिक सागर आदित्य
देशातली पहिली सायकल स्कॉट जीनियस 910 तब्बल 5 लाख 50 हजार रुपये किमतीची वाशिम येथे उपलब्ध
वाशिम :- स्थानिक गोपाल टॉकीज जवळ येथील न्यू शर्मा सायकल ब्रदर्स शोरूम द्वारे भारतातली पहिली सायकल स्कॉट जीनियस 910 वाशिम उपलब्ध करून दिल्याने लोकांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सदर सायकलची किंमत पाच लाखापेक्षा जास्त असल्याने याचे लोकांची पसंती या सायकलला मिळत आहे.
सायकल व्यवसायात शर्मा ब्रदर्सची ही तिसरी पिढी आहे*. सर्वात पहिले आजोबा मुरलीधर शर्मा स.न. 1952 पासून यांनी रुपये 70/- पासून सायकल विक्रीस सुरुवात केली होती त्यानंतर त्यांची मुलं पुरुषोत्तम शर्मा आणि सुभाष शर्मा यांनी रुपये १५००/- पासून ते रू.१०,०००/- पर्यंत किमतीचे सायकल विक्री केल्यात आणि आता त्यांचे नातू पवन शर्मा (मेकॅनिकल इंजिनियर), चेतन शर्मा (एमबीए)( प्रोफेशनल सायकालिस्ट) यांनी रू १०,०००/- ते रू ५.५० लाखापर्यंत किमतीचे सायकल विक्रीचा उच्चांक गाठला आहे.
सायकलच्या या भव्य शोरूम मध्ये देश विदेशातील नामांकित तसेच प्रतिष्ठित कंपनीच्या सायकल विक्री उपलब्ध आहेत. लहान मुलांपासून तर मोठ्या लोकांपर्यंत सायकलची संपूर्ण रेंज या शोरूमला सायकल प्रेमींसाठी मिळत असल्याने लोकांचा कल न्यू शर्मा ब्रदर्स शोरूम कडे वाढत आहे. संचालक पुरुषोत्तम शर्मा यांचे मूल पवन शर्मा आणि चेतन शर्मा द्वारे सायकल साठी लागणारी ग्राहकांना उत्तम सेवा तसेच योग्य मार्गदर्शन मुळे सायकलच्या व्यवसायात त्यांनी आपला नावाचा ठसा उमटविला आहे. या शोरूम ला ग्राहकांसाठी रु ५०००/- पासून ते रू ५.५० लाखापर्यंत सायकल उपलब्ध आहे. देश-विदेशातील सायकल व आपल्या मनपसंत सायकल खरेदी करणाऱ्यांनी एकदा अवश्य या शोरूम ला भेट द्यावी व नामांकित कंपनीच्या सायकल चालविण्याचा आनंद घ्यावा असे आवाहन संचालक द्वारे करण्यात आले आहे. आम्ही फक्त सायकलच विकत नसून जन् सामान्यांचा आरोग्य जपण्याचाही काम करीत आहोत सायकल चालविण्याने पर्यावरण ही संतुलित राहते आणि सर्वसामान्यांचा आरोग्यही सुदृढ राहते अशी प्रतिक्रिया संचालकांनी व्यक्त केली
0 Response to "देशातली पहिली सायकल स्कॉट जीनियस 910 तब्बल 5 लाख 50 हजार रुपये किमतीची वाशिम येथे उपलब्ध"
Post a Comment