
हळद खरेदी सुरू करा:- भूमिपुत्र
साप्ताहिक सागर आदित्य
हळद खरेदी सुरू करा:- भूमिपुत्र
एका महिन्यापासून हळद खरेदी बंद असलेली सुरू करण्याकरिता भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर साहेब यांनी बैठक घेतली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काही किरकोळ अडचणी मुळे गेल्या एक महिन्यापासून हळद खरेदीचे व्यवहार बंद आहेत. रिसोड कृ. उ. बा. समीती हळद खरेदीचे नव- नवीन विक्रम स्थापीत करीत आसुन राज्यातील पहील्या चार/ पाच क्रमांकाची विक्रमी आवक रिसोड बाजार समितीत होत आहे. पंरतु आचानक आशा प्रकारे खरेदी बंद होणे योग्य नाही. या मुळे शेतकरी, व्यापारी, आडते, हमाल आणि रिसोड व्यापारपेठेचे प्रचंड नुकसान होत आहे. प्रशासक मोरे साहेब, सचिव देशमुख भूमिपुत्र ट्रेडिंग कंपनीचे मालक रवि पाटील जाधव व हमाल प्रतिनिधी, आडते प्रतिनिधी, व्यापारी हळदीचे मार्केट बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होत आहेत शेतकऱ्याचा सण बैलपोळा आला असून शेतकऱ्यांना सणाच्या येण्याच्या तोंडावर मार्केट मधील हळद खरेदी बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे शेतकऱ्यांना अडचण येऊ नये याची काळजी घ्या आणि हळद खरेदी लवकरात लवकर सुरू करा असे कृषी उत्पन्न बाजार समितीला भूमिपुत्र संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांनी म्हटले यांच्यासह बाबाराव ढोणे, संजयजी सदार व भूमिपुत्रचे युवक जिल्हा उपाध्यक्ष व भूमिपुत्र ट्रेडिंग कंपनी मालक रवि पाटील जाधव यांच्यासह बाजार समिती प्रशासना सोबत सकारात्मक बैठक झाली. पूर्ववत हळद खरेदी सुरू करण्यासाठी सर्व अनुकूल आसुन पोळ्या नंतर हळद खरेदी सुरू होईल असी आशा बाळगण्यास हरकत नाही...भूमिपुत्र
0 Response to "हळद खरेदी सुरू करा:- भूमिपुत्र "
Post a Comment