18 जुलैपासून 45 दिवसाच्या आत हरकती व सूचना मागविल्या कामगार आयुक्तांचे आवाहन
साप्ताहिक सागर आदित्य
18 जुलैपासून 45 दिवसाच्या आत
हरकती व सूचना मागविल्या
कामगार आयुक्तांचे आवाहन
वाशिम, : महाराष्ट्र व्यावसायीक सुरक्षा, आरोग्य व सेवाशर्ती संहिता (कामगार) मसुदा नियम 2021 चा मसुदा शासनाच्या राजपत्रामध्ये 18 जुलै रोजीच्या अधिसुचनेव्दारे प्रसिध्द करण्यात आला आहे. हा मसुदा नियम कामगार विभागाच्या https://mahakamgar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर केंद्रीय कायदे व नियम या शिर्षाखाली प्रसिध्द करण्यात आला आहे. या अधिसूचनेव्दारे प्रसिध्द केलेल्या मसुद्याबाबत 45 दिवसाच्या आत हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत.
या प्रारुप/मसुद्याबाबत कोणतेही आक्षेप किंवा सूचना असल्यास कामगार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, कामगार भवन, सी-20, ब्लॉक-ई, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे पूर्व, मुंबई 400051 या कार्यालयात किंवा कामगार आयुक्तालयाच्या mahalabourcommr@gmail.com या ई-मेलवर स्विकारण्यात येतील. असे सरकारी कामगार अधिकारी गौरवकुमार नालिंदे यांनी कळविले आहे.
आहे.




0 Response to " 18 जुलैपासून 45 दिवसाच्या आत हरकती व सूचना मागविल्या कामगार आयुक्तांचे आवाहन"
Post a Comment