वाशिम : ट्रॅव्हल-टँकरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात ३ ठार, ८ जखमी
साप्ताहिक सागर आदित्य/
वाशिम : ट्रॅव्हल-टँकरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात ३ ठार, ८ जखमी
वाशिम - शहरालगत अकोला नाका परिसरात आज सकाळी भीषण अपघात झाला. पुण्यावरून यवतमाळ जाणाऱ्या खासगी बस आणि पाण्याच्या टँकरची समोरासमोर धडक झाली. अपघात एवढा भयंकर होता टँकरमधील चालक आणि क्लीनर जागीच ठार झाले. टँकरमधील एक गंभीर जखमी आहे.
खासग बसमधील एकाचा जागीच मृत्यू झाला. बसमधील ७ जण जखमी झाले. दरम्यान जखमींना वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे.गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात येणार आहे.
0 Response to "वाशिम : ट्रॅव्हल-टँकरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात ३ ठार, ८ जखमी"
Post a Comment