रामराव झनक महाविद्यालयात रासेयो शिबिरा अंतर्गत मोफत तपासणी
साप्ताहिक सागर आदित्य/
सुश्रुत मुळव्याध हाँस्पिटल व आयुर्वेद पंचकर्म सेंटर मालेगाव चे डाँ राजेश दळवे द्वारा
रामराव झनक महाविद्यालयात रासेयो शिबिरा अंतर्गत मोफत तपासणी
मालेगाव - गरम मसाला मुक्त , प्रमाणात आहार ग्रहन करणे, नियमित विहार अर्थातच आयाम- व्यायाम, योगा प्राणायाम केल्यास व आरोग्याचे नियम काटेकोरपणे पाळल्यास मुळव्याध भगंदर, पोटाचे विकार इत्यादी रोगांपासून सुटका मिळून सुदृढ आरोग्य जोपासल्या जाऊन आनंददायी जीवन जगता येते असे प्रतिपादन
मालेगाव येथील सुश्रुत मुळव्याध हाँस्पिटल व पोट विकार आयुर्वेद पंचकर्म सेंटर येथील मुळव्याध तज्ज्ञ डॉक्टर राजेश दळवे यांनी केले.
ते रामराव झनक कला व वाणिज्य महाविद्यालय मालेगावच्या रासेयो विशेष श्रमसंस्कार शिबिरात दत्तक ग्राम खिर्डा येथे " मुळव्याध, भगंदर व पोटाचे विकार " या विषयावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. योगेश्वर निकस होते.
डॉ. राजेश दळवे यांनी संबंधित रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार दिला. तसेच मुळव्याधवरील आधुनिक उपचार पद्धतीबाबत उपस्थितांना माहिती दिली. प्रास्ताविकातून रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. भीमराव जांभरुणकर यांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. संचालन प्रियंका जमधाडे हिने, तर आभाप्रदर्शन अंजली वाझुळकर हिने केले.
कार्यक्रमाला राजेश दळवे व भारत इंगळे, वामन इंगळे विचारमंचावर विराजमान होते. त्यांनी उपस्थितांना महापुरुषांच्या प्रतिमा भेट देऊन त्यांना प्रेरित करून कार्यप्रवण बनविले. कार्यक्रमाची सुरुवात कर्मयोगी संत गाडगेबाबांच्या यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.
0 Response to "रामराव झनक महाविद्यालयात रासेयो शिबिरा अंतर्गत मोफत तपासणी"
Post a Comment