-->

प्लास्टिक राष्ट्रध्वजाच्या विक्री व वापरास मनाई

प्लास्टिक राष्ट्रध्वजाच्या विक्री व वापरास मनाई


साप्ताहिक सागर आदित्य/

प्लास्टिक राष्ट्रध्वजाच्या विक्री व वापरास मनाई

वाशिम - १ मे या महाराष्ट्र दिनी लहान आकारातील कागदी किंवा प्लास्टिक राष्ट्रध्वजाची मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात येते. शालेय विद्यार्थी व लहान मुले यांच्यासह अनेक व्यक्ती राष्ट्रभक्ती आणि उत्साहामुळे राष्ट्रध्वज विकत घेतात. त्याच दिवशी सायंकाळी किंवा दुसऱ्या दिवशी इतरत्र हे ध्वज टाकले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अपमान होतो. काही वेळा तसेच विशेष कला व क्रीडा स्पर्धेच्या प्रसंगी वैयक्तिकरित्या वापरण्यात येणारे राष्ट्रध्वज इतरत्र टाकले जातात. तर रस्त्यात विखुरलेले राष्ट्रध्वज प्लास्टिकचे असतील तर प्लास्टिक बरेच दिवस नष्ट होत नाही. त्यामुळे बरेच दिवस त्याच ठिकाणी पडून असतात. राष्ट्रहिताच्या दृष्टीने ही गंभीर बाब आहे. राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही त्यासाठी प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाची विक्री व वापर कोणीही करू नये. असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
      राष्ट्रध्वजाचा आदर करणे हे देशातील प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य आहे.राष्ट्रध्वजाचा अवमान करणे व त्याची विटंबना करणे हा दंडनीय अपराध आहे. वापरास उपयुक्त नसलेले, फाटलेले व जीर्ण झालेले किंवा माती लागलेले, रस्त्यावर किंवा मैदानावर पडलेले राष्ट्रध्वज गोळा करून ते तालुका पातळीवर तहसील कार्यालय आणि जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी कार्यालय येथे निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस पूर्तता करावे. त्यासाठी शैक्षणिक संस्था, महाविद्यालय व प्रशिक्षण संस्था व सर्व यंत्रणेमार्फत ही बाब विद्यार्थी व नागरिकांच्या लक्षात आणून देण्यासाठी सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

0 Response to "प्लास्टिक राष्ट्रध्वजाच्या विक्री व वापरास मनाई"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article