ध्वनीची विहित मर्यादा राखून ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरात सूट
साप्ताहिक सागर आदित्य/
सन २०२२ या वर्षात दहा दिवस
ध्वनीची विहित मर्यादा राखून ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरात सूट
वाशिम - जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था लक्षात घेता जिल्ह्यासाठी सन २०२२ या वर्षात १० दिवस सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीची विविध मर्यादा राखून ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धक वापरास जिल्हादंडाधिकारी,वाशिम यांनी सूट दिली आहे.याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक, वाशिम यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केला होता.
ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० मधील नियम ५ (३) नुसार ध्वनीची विहित मर्यादा राखून सन २०२२ या वर्षातील पुढील दिवसाकरीता ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत वापराकरिता सूट देण्यात येत आहे .
14 एप्रिल - डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव. गणपती उत्सव - तीन दिवस. ३१ऑगस्ट (गणपती स्थापना), ९ सप्टेंबर व १० सप्टेंबर ( गणपती विसर्जन).
नवरात्री उत्सव - दोन दिवस. ३ ऑक्टोबर (अष्टमी) व ४ ऑक्टोबर ( नवमी ). ईद-ए-मिलाद - ९ ऑक्टोबर.दिवाळी - २४ ऑक्टोबर ( लक्ष्मीपूजन ), ख्रिसमस - २५ डिसेंबर आणि ३१ डिसेंबर.असे एकूण दहा दिवस निश्चित केले आहे.ध्वनी मर्यादेचे व तरतुदींचे उल्लंघन होणार नाही,त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्या.उच्च न्यायालयाने वेळोवेळी ध्वनिप्रदूषण संबंधात दिलेल्या आदेशात नमूद बाबीचे तंतोतंत पालन करावे. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होणार नाही,याची दक्षता घेण्यात यावी. असे जिल्हादंडाधिकारी,वाशिम यांनी आदेशात नमूद केले आहे.
0 Response to "ध्वनीची विहित मर्यादा राखून ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरात सूट"
Post a Comment