पुणे येथे अंनिसची राज्यस्तरीय बैठक संपन्न
साप्ताहिक सागर आदित्य/
पुणे येथे अंनिसची राज्यस्तरीय बैठक संपन्न
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची राज्य कार्यकारणी बैठक पुणे येथे एस. एम.जोशी सोशालिस्ट फाऊंडेशन च्या सभागृहात संपन्न झाली राज्यस्तरिय बैठकीत वर्ष भरातील विविध कामाचा आढावा व प्रस्तावित कामाचे नियोजन व विविध ठराव पास करण्यात आले. राज्य कार्यकारणी ला सदिच्छा भेट व शुभेच्छा देण्यासाठी थोर समाज सुधारक व पुरोगामी विचारांचे नेते बाबा आढाव, प्रा. सुभाष वारे आदी नी मार्गदर्शन केले.
वाशिम जिल्हयाचा आढावा जिल्हा कार्याध्यक्ष पी. एस.खंदारे यांनी मांडून जिल्हा भेटी साठी राज्य पदाधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन आम्हाला प्रोत्साहीत करावे असे सांगितले याबाबत सविस्तर वृत्त असे की,शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर स्थापित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती राज्य पदाधिकारी आणि जिल्हा कार्याध्यक्ष, सचिवांची राज्यस्तरीय बैठक , २६ व २७ मार्च , पुणे येथे पार पडली . या बैठकीत अनिसच्या बऱ्याच विषयावर गहन अशी चर्चा करण्यात आली तसेच.महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या विवेकजागर प्रकाशनाचे 'फलज्योतिष : भ्रमातून वास्तवाकडे' या पुस्तकाचे प्रकाशन, समाजप्रबोधनकार श्यामसुंदर महाराज सोन्नर यांच्या हस्ते झाले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र अंनिसचे राज्य उपाध्यक्ष श्यामराव अण्णा पाटील होते. यावेळी वाशिम जिल्हा कार्याध्यक्ष पी एस खंदारे यांनी वाशिम जिल्हयातील समाज प्रबोधनाच्या कार्याची माहिती दिली . वाशिम जिल्हयातील अंनिसच्या व्यापक कार्या बद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले तसेच बैठकीला लेखक डॉ. नितीन शिंदे, प्रकाशनचे कार्यवाह मच्छिन्द्रनाथ मुंडे, सहकार्यवाह विशाल विमल, प्रधानसचिव माधव बावगे, सुशीला मुंडे, संजय बनसोडे,शिवाजी शिक्षण संस्थेचे माजी उपाध्यक्ष तथा राज्य उपाध्यक्ष महादेवराव भुईभार आणि महाराष्ट्र अंनिसचे दीडशे राज्य-जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते. अशी माहिती महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे वाशिम जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी प्रसिद्धी पत्रकात दिली आहे .
0 Response to "पुणे येथे अंनिसची राज्यस्तरीय बैठक संपन्न"
Post a Comment