दिगंबर जैन सैतवाळ समाजातर्फे रक्तदान शिबिर संपन्न
साप्ताहिक सागर आदित्य/
दिगंबर जैन सैतवाळ समाजातर्फे रक्तदान शिबिर संपन्न
कारंजा- श्रीमती यमुनाबाई सैतवाळ दिगंबर जैन धर्मादाय ट्रस्ट कारंजा तसेच अखिल दिगंबर जैन सैतवाळ संस्था शाखा कारंजा यांच्या संयुक्त विद्यमाने परमपूज्य 108 आचार्य आर्यनंदी महाराज यांच्या वासल्य दिनानिमित्त तसेच स्वर्गीय सुहास फुरसुले अध्यक्ष सरस्वती सैतवाळ दिगंबर जैन धर्मदाय संस्था यांच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक 27 मार्च रोजी सरस्वती भवन येथे संपन्न झाले.
मुकुंदजी वालचाळे , राष्ट्रीय महामंत्री अखिल दिगंबर जैन सैतवाळ संस्था ,डॉ सुशिलजी देशपांडे,डॉ विवेकजी बुडे डॉ.अमेय दानखडे,डॉ.अनिल कविमंडल सर गाडगे बाबा रक्तपेढी आदि मान्यवर उस्थितीत होते. यावेळी रक्तदान शिबिरामध्ये 40 लोकांनी रक्तदान केले. यामध्ये छंदक आठवले यांनी एकतिसावे तर खरेदी विक्री व्यवस्थापक आशिष ठाकरे यांनी अकरावे रक्तदान केले. अंकित जवळेकर यांनी वाढदिवसानिमित्त रक्तदान केले. तसेच यावेळी बालरोगतज्ञ डॉ.स्वप्नील हाके सर, भुलतज्ञ डॉ प्रेषित पिंपळे सर यांनी स्वतः रक्तदान करून सहभाग नोंदविला. रक्तदान शिबिराचे संचालन पवन उखळकर यांनी केले. यावेळी शिबिराच्या यशस्वितेकरिता जैन समाजातील युवकांनी तसेच सैतवाळ संस्थेचे सदस्य व सरस्वती भुवनचे विश्वस्त यांनी परिश्रम घेतले. असे वृत्त प्रत्यक्षदर्शी असलेले महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी प्रसार माध्यमाला कळविले आहे .
0 Response to "दिगंबर जैन सैतवाळ समाजातर्फे रक्तदान शिबिर संपन्न"
Post a Comment