जेष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटात सवलत मिळणार की नाही? रेल्वेमंत्र्यांनी दिलं उत्तर
साप्ताहिक सागर आदित्य/
जेष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटात सवलत मिळणार की नाही? रेल्वेमंत्र्यांनी दिलं उत्तर
देशातील ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे भाड्यात ५० ते ५५ टक्के सवलत मिळत होती, ती २ वर्षांपासून बंद आहे.
नवी दिल्ली - ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटांमध्ये मिळणाऱ्या सवलतींबाबत अनेक दिवसांपासून गोंधळ सुरू आहे. याबाबत सरकारने अद्याप विशेष स्वारस्य दाखवले नव्हते, मात्र रेल्वेमंत्र्यांनी संसदेत दिलेल्या उत्तरातून सरकारचा हेतू स्पष्ट झाला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी लोकसभेत सांगितले की, सध्या ज्येष्ठ नागरिकांना भाड्यात सवलत देण्याची सरकारची कोणतीही योजना नाही.
देशातील ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे भाड्यात ५० ते ५५ टक्के सवलत मिळत होती, ती २ वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे सर्व ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे भाड्यात कोणतीही सूट न देता प्रवास करावा लागत आहे. कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन दरम्यान रेल्वेने मार्च २०२० मध्ये ही सुविधा पुढे ढकलली होती. तेव्हापासून ही योजना बंद आहे.
ज्येष्ठ नागरिकांच्या रेल्वे प्रवासात वाढदरम्यान, कोरोना महामारीनंतरच्या २ वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर ज्येष्ठ नागरिकांच्या रेल्वे प्रवासात वाढ झाली आहे. लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात माहिती देताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, २० मार्च २०२० ते ३१ मार्च २०२१ दरम्यान १.८७ कोटी ज्येष्ठ नागरिकांनी रेल्वेने प्रवास केला, तर १ एप्रिल २०२१ ते फेब्रुवारी २०२२ दरम्यान ४.७४ कोटी ज्येष्ठ नागरिकांनी रेल्वेने प्रवास केला. मात्र ज्येष्ठ नागरिकांना दिलेली ही सवलत पुन्हा लागू करण्याची कोणतीही योजना नाही. ४० स्थानके विकसित करण्याचे नियोजन याशिवाय, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, आदर्श स्थानक योजनेअंतर्गत १२५३ रेल्वे स्थानके चिन्हांकित करण्यात आली आहेत आणि त्यापैकी १,२१३ स्थानकांचा आतापर्यंत विकास करण्यात आला आहे. उर्वरित ४० स्थानके २०२२-२३ या आर्थिक वर्षात विकसित करण्याचे नियोजन असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, खासदार विष्णू दयाल राम यांच्या प्रश्नाला रेल्वेमंत्र्यांनी लेखी उत्तरात हे उत्तर दिले.
0 Response to "जेष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटात सवलत मिळणार की नाही? रेल्वेमंत्र्यांनी दिलं उत्तर"
Post a Comment