अत्याधुनिक मशीनद्वारे कॅल्शिअम तपासणी शिबीर संपन्न
साप्ताहिक सागर आदित्य/
अत्याधुनिक मशीनद्वारे कॅल्शिअम तपासणी शिबीर संपन्न
मंगरुळपीर -
७३ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शेलूबाजार येथील नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले डॉक्टर आडोळे दांपत्य यांनी आज नागपूर येथून आलेल्या डॉ संदीप ठाकूर, सतीश खाडे, सौरभ सारडा यांच्या चमूने शेलुबाजार परिसरातील रुग्णांची अत्याधुनिक मशीनद्वारे कॅल्शिअम तपासणी केली. हे शिबीर शेलुबाजार येथील भाग्योदय हॉस्पिटल येथे घेण्यात आले होते. परिसरातील नागरिकांना कॅल्शियम या घटकाची आपल्या शरीरामध्ये किती प्रमाणामध्ये आवश्यकता आहे, ते किती असायला पाहिजे, कॅल्शियम हा घटक आपल्याला कोण कोणत्या पदार्थांमधून मिळतो याची संपूर्ण माहिती बोन डेंस्टोनिस कॅम्प च्या वतीने उपस्थित रुग्णांना देण्यात आली आहे. या शिबिरामध्ये १५५ रुग्णांनी लाभ घेतला आहे. या शिबिराचे आयोजन भाग्योदय हॉस्पिटल चे संचालक डॉ अरविंद आडोळे व डॉ महिंद्रा आडोळे यांनी केले होते. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी भाग्योदय हॉस्पिटलच्या सर्व सहकाऱ्यांनी सहकार्य केले.
0 Response to "अत्याधुनिक मशीनद्वारे कॅल्शिअम तपासणी शिबीर संपन्न"
Post a Comment