मंत्री पार्क गणेशोत्सव मंडळात दिली आरोग्य विभागाच्या विविध योजनांची माहिती
साप्ताहिक सागर आदित्य
गणेशोत्सवातून शासकीय योजनांचा 'लोकसंवाद' उत्साहात सुरुवात
📍 मंत्री पार्क गणेशोत्सव मंडळात दिली आरोग्य विभागाच्या विविध योजनांची माहिती
वाशिम, : गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आला असून, या उत्सवाच्या माध्यमातून शासनाचे धोरणात्मक निर्णय आणि विविध महत्त्वाच्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत ‘लोकसंवाद-२०२६’ हा विशेष जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे.
जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या सहकार्याने जिल्हा माहिती कार्यालय, वाशिमच्या वतीने विविध विषयांवरील शासकीय योजना, उपक्रम आणि निर्णयांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास मंत्री पार्क गणेशोत्सव मंडळ, मंत्री पार्क, वाशिम येथे आरोग्य विभागाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली. जिल्हा माध्यम व विस्तार अधिकारी स्वप्नील चव्हाण यांनी नागरिकांशी संवाद साधत आरोग्य विभागाच्या विविध योजना, उपक्रम आणि उपलब्ध शासकीय सुविधांची माहिती दिली.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधून शासकीय योजनांची माहिती पोहोचविणे आणि उपलब्ध सुविधांबाबत जनजागृती करणे, हा ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमाचा उद्देश आहे.
या उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन शासकीय योजनांची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी नागरिक उपस्थित होते.
#लोकसंवाद२०२६ #गणेशोत्सव #शासकीययोजना #आरोग्यविभाग #जनजागृती #जिल्हामाहितीकार्यालयवाशिम #वाशिम
0 Response to "मंत्री पार्क गणेशोत्सव मंडळात दिली आरोग्य विभागाच्या विविध योजनांची माहिती"
Post a Comment