सेवा संकल्प अभियानातून जात वैधता प्रकरणांना गती जात वैधता व सेवा प्रकरणांवर विशेष सुनावणी; प्रकरणे तात्काळ निकाली
साप्ताहिक सागर आदित्य
🔷 सेवा संकल्प अभियानातून जात वैधता प्रकरणांना गती
जात वैधता व सेवा प्रकरणांवर विशेष सुनावणी; प्रकरणे तात्काळ निकाली
📍 वाशिम, दि. २२ सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकीर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तसेच ‘सेवा परमोधर्म’ या उक्तीप्रमाणे सामान्य नागरिकांपर्यंत सेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने राज्यात दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, वाशिमच्या वतीने जात वैधता व सेवा प्रकरणांवर विशेष सुनावणी घेण्यात आली.
👤 मा. अध्यक्ष तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी (निवड श्रेणी) जितेंद्र काकुस्ते यांच्या अध्यक्षतेखाली दि. २२ सप्टेंबर रोजी ही सुनावणी घेण्यात आली. राज्य सामाईक प्रवेश पात्रता परीक्षा अंतर्गत प्राप्त झालेल्या त्रुटींमधील जात वैधता प्रकरणे तसेच सेवा प्रकरणांचा सुनावणीमध्ये समावेश होता.
👥 सुनावणीस विद्यार्थी, पालक तसेच अर्जदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुनावणीदरम्यान प्राप्त प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यात आली. त्यामुळे संबंधित विद्यार्थी व अर्जदारांना त्यांच्या प्रकरणांच्या कार्यवाहीबाबत आवश्यक ती मदत मिळाली.
📢 दरम्यान, त्रुटींमुळे प्रलंबित असलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रकरणातील त्रुटींची पूर्तता लवकरात लवकर करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने अध्यक्ष तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी (निवड श्रेणी) जितेंद्र काकुस्ते यांनी केले आहे.
#सेवा_संकल्प_अभियान #सेवा_परमोधर्म #जात_वैधता #जात_प्रमाणपत्र #विशेष_सुनावणी #वाशिम #जिल्हा_प्रशासन #ServiceSankalp
0 Response to "सेवा संकल्प अभियानातून जात वैधता प्रकरणांना गती जात वैधता व सेवा प्रकरणांवर विशेष सुनावणी; प्रकरणे तात्काळ निकाली"
Post a Comment