-->

विभागीय लोकशाही दिन १५ सप्टेंबर रोजी  १४ सप्टेंबरला सुट्टी असल्याने बदल

विभागीय लोकशाही दिन १५ सप्टेंबर रोजी १४ सप्टेंबरला सुट्टी असल्याने बदल



 साप्ताहिक सागर आदित्य 

📢 विभागीय लोकशाही दिन १५ सप्टेंबर रोजी

१४ सप्टेंबरला सुट्टी असल्याने बदल


वाशिम,  : शासन सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील शासन परिपत्रक क्र.प्रसुधा. २०११/प्र.क्र.१८९/११/१२-अ, दि. २६ सप्टेंबर २०१२ अन्वये दर महिन्याला दुसऱ्या सोमवारी विभागीय लोकशाही दिन तसेच संदर्भ क्र. २ मधील शासन निर्णयान्वये महिला विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन सुध्दा प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी आयोजित करण्यात येते.

तसेच दि. १४ सप्टेंबर, २०२६ चे दुसऱ्या सोमवारला श्री. गणेश चतुर्थी असल्यामुळे सार्वजनिक सुट्टी आहे. शासन परिपत्रक दि. २६ सप्टेंबर २०१२ मधील मुद्दा क्र. ५.१ नुसार लोकशाही दिनाचे दिवशी शासकीय सुट्टी असल्यास, त्यानंतर येणारा कामकाजाचा दिवस "लोकशाही दिन" म्हणून पाळण्यात येईल अशी तरतूद आहे.

सबब विभागीय लोकशाही दिन व महिला लोकशाही दिनाचे आयोजन दि. १४ सप्टेंबर, २०२६ ऐवजी १५ सप्टेंबर, २०२६ (मंगळवार) रोजी आयोजित करण्यात येत असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.

#विभागीयलोकशाहीदिन #महिलालोकशाहीदिन #वाशिम #जिल्हामाहितीकार्यालयवाशिम

#विभागीयआयुक्तकार्यालयअमरावती

0 Response to "विभागीय लोकशाही दिन १५ सप्टेंबर रोजी १४ सप्टेंबरला सुट्टी असल्याने बदल"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article