मौजे मानोरा येथील स्व. चंद्रकला सुभाष चव्हाण यांचे मरणोत्तर नेत्रदान
साप्ताहिक सागर आदित्य
मौजे मानोरा येथील स्व. चंद्रकला सुभाष चव्हाण यांचे मरणोत्तर नेत्रदान
वाशिम जिल्हयातील मानोरा येथील रहिवासी दत्तराव चव्हाण यांची आई स्व. चंद्रकला सुभाष चव्हाण यांच्या वयाच्या ७८ व्या वर्षी दिनांक १८/०८/२०२६ रोजी दूपारी ०२.३० वाजता निधन झाले. चव्हाण कुंटुबातील सर्वात मोठे व सर्वाना सोबत घेऊन चालणारे तसेच समाजकार्याची आवड असलेला स्व. चंद्रकला सुभाष चव्हाण यांचे निधन झाल्याने संपूर्ण चव्हाण कुटुंबावर दुःखाचा डोंगर उभा असताना चव्हाण कुंटुंबीयांनी एवढ्या दुखामध्येही मुत्यनंतर दोन अंधाच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्यासाठी नेत्रदान करण्याची इच्छा व्यक्त करत माणोरा येथे एक आदर्श निर्माण केला.
त्यानूसार जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे, अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अविनाश पुरी, नेत्र शल्यचिकित्सक, डॉ. आशिष बेदरकर, यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्रदान समुपदेशक रमेश ठाकरे नेत्रचिकित्सा अधिकारी सुधिर साळवे, ऋतिक भूते यांनी स्व. चंद्रकला सुभाष चव्हाण यांची नेत्र बुबुळे काढली व नेत्र बुबुळे त्याच दिवशी वैद्यकिय महाविद्यालय, अकोला येथे पाठविण्यात आली. तरी या नेत्रांच्या सहायाने दोण दृष्टि हिनांना पुन्हा प्रकाश पाहण्याची संधी उपलब्ध होणार असून चव्हाण कुटुबिंयाच्या निर्णयाचे सर्वत्र कौतूक होत आहे. कुटूबिंयानी जनतेला संदेश देताना सांगितले की, नेत्रदान हि अत्यंत पवित्र व मानवतावादी कृती असुन, मृत्युनंतरही एखादयाच्या आयुष्यात प्रकाश देण्याची संधी यातुन मिळते. भारतात दरवर्षी हजारो लोक नेत्र मिळण्याच्या प्रतिक्षेत असतात. मात्र नेत्रदानाबाबत जागरुकतेच्या अभावामुळे आवश्यक तेवढी नेत्र उपलब्ध होत नाहीत. नेत्रदान करणे म्हणजे एखादयाला नवजिवन देणे. अशा कार्यात अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे. सदरील नेत्रदान करण्याकरीता श्री. पृथ्वीराज चव्हाण, दत्त्राव सुभाषराव चव्हाण, डॉ. कोमल मधुकर बोडखे, आरती सुनिल भगत व चव्हाण कुंटुबांचे सहकार्य लाभले.
तरी सर्व समाजातील गणमान्य व्यक्तींनी या नेत्रदान चळवळीत सक्रीय सहभाग घेवुन नेत्रदान चळवळ ही लोक चळवळ व्हावी. मृत्यूनंतर जवळच्या व्यक्तीचे त्वरीत नेत्रदान घडवून आणावे व नेत्रदाना नंतरच मृतावर अंतिम संस्कार करावे असे अवाहन जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अनिल कावरखे यांनी केले असुन चव्हाण कुटूंबाचे आभार मानले आहेत.
नेत्रदानासाठी संपर्क क्रं.९९२२५१९९४८ (जि.रु. वाशिम)
0 Response to "मौजे मानोरा येथील स्व. चंद्रकला सुभाष चव्हाण यांचे मरणोत्तर नेत्रदान"
Post a Comment