-->

हर घर तिरंगा' अभियान उत्साहात आणि लोकसहभागातून यशस्वी करूया

हर घर तिरंगा' अभियान उत्साहात आणि लोकसहभागातून यशस्वी करूया

 


साप्ताहिक सागर आदित्य 

🇮🇳 'हर घर तिरंगा' अभियान उत्साहात आणि लोकसहभागातून यशस्वी करूया


जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे आवाहन


देशाच्या स्वातंत्र्याचा अभिमान प्रत्येक घरापर्यंत पोहोचविणाऱ्या 'हर घर तिरंगा' अभियानाची जिल्ह्यात ९ ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत उत्साहपूर्ण अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या अभियानात प्रत्येक नागरिकाचा सहभाग वाढावा, सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे आणि सोपविलेल्या जबाबदाऱ्या वेळेत पूर्ण कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी जिल्हास्तरीय आढावा बैठकीत दिले.


जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. बैठकीत अभियानाच्या पूर्वतयारीचा सविस्तर आढावा घेऊन प्रत्येक विभागाच्या जबाबदाऱ्यांबाबत सूचना देण्यात आल्या.


यावर्षीचे 'हर घर तिरंगा' अभियान 'वंदे मातरम्' गीताच्या १५० वर्षांच्या स्मरणार्थ समर्पित आहे. या निमित्ताने जिल्हाभर सामूहिक 'वंदे मातरम्' गायन, प्रभात फेऱ्या, बाईक रॅली, देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम, जनजागृती उपक्रम तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. विद्यार्थी, युवक, महिला, स्वयंसेवी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था आणि सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप द्यावे, असे आवाहन करण्यात आले.


राष्ट्रध्वजाचा सन्मान, त्याचा योग्य वापर आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रभावी जनजागृती करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित सर्व कार्यक्रम शिस्तबद्ध, समन्वयपूर्ण आणि प्रभावीपणे पार पडावेत, यासाठी प्रत्येक विभागाने परस्पर सहकार्याने कार्य करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.


यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी सांगितले की, अभियानाला पाठबळ देण्यासाठी विदर्भ विभागातील सर्व टपाल कार्यालयांमध्ये भारतीय राष्ट्रध्वज विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. भारताच्या ध्वज संहितेनुसार तयार करण्यात आलेले हे राष्ट्रध्वज शासकीय कार्यालये, संस्था, संघटना तसेच सर्वसामान्य नागरिकांना टपाल कार्यालयांच्या काउंटरवर उपलब्ध आहेत. अभियानादरम्यान प्रत्येकाने ध्वज संहितेचे पालन करून राष्ट्रध्वजाचा सन्मान राखावा, असेही त्यांनी आवाहन केले.


मोठ्या प्रमाणात राष्ट्रध्वज खरेदीसाठी किंवा अधिक माहितीसाठी टपाल विभागाचे विपणन कार्यकारी होनमने यांच्याशी ८००७९०५७०९ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.


🇮🇳 घराघरात तिरंगा... मनामनात राष्ट्रभक्ती!

९ ते १७ ऑगस्ट या कालावधीत प्रत्येक घर, प्रत्येक संस्था आणि प्रत्येक नागरिकाने राष्ट्रध्वज फडकवून स्वातंत्र्याचा अभिमान व्यक्त करूया. 'हर घर तिरंगा' अभियान यशस्वी करण्यासाठी आपला सक्रिय सहभाग नोंदवूया.


#HarGharTiranga #HarGharTiranga2026 #VandeMataram150  #AzadiKaAmritMahotsav #IndianFlag #Tiranga #PatrioticIndia #Maharashtra #IndependenceDay #NationFirst

0 Response to "हर घर तिरंगा' अभियान उत्साहात आणि लोकसहभागातून यशस्वी करूया"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article