-->

जिल्ह्यात ‘महाराष्ट्र युवा जलदूत’ होण्याची संधी  मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धेचे आयोजन  १५ ते ३० वयोगटातील युवक-युवतींना सहभागी होता येणार

जिल्ह्यात ‘महाराष्ट्र युवा जलदूत’ होण्याची संधी मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धेचे आयोजन १५ ते ३० वयोगटातील युवक-युवतींना सहभागी होता येणार

 


साप्ताहिक सागर आदित्य 

जिल्ह्यात ‘महाराष्ट्र युवा जलदूत’ होण्याची संधी

मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धेचे आयोजन

१५ ते ३० वयोगटातील युवक-युवतींना सहभागी होता येणार


प्रथम तीन विजेत्यांना पुरस्कार


वाशिम, दि. १३ ऑगस्ट (जिमाका) : राज्याचे माजी मुख्यमंत्री सुधाकररावजी नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त २१ ऑगस्ट रोजी ‘जलसंधारण दिन’ साजरा करण्यात येणार आहे. तसेच १५ ते २१ ऑगस्टदरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’ आणि १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत ‘जलसंधारण अभियान’ राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाला लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी आणि युवा पिढीचा डिजिटल सहभाग वाढविण्यासाठी जिल्हास्तरावर ‘Reel for Soil and Water Conservation’ अर्थात ‘मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे.


या स्पर्धेत जिल्ह्यातील १५ ते ३० वयोगटातील युवक-युवतींना सहभागी होता येणार आहे. स्पर्धकांनी माती संवर्धन, पाणी बचत, पावसाच्या पाण्याचे संकलन किंवा जलयुक्त गावातील यशस्वी कामांवर आधारित ३० ते ६० सेकंदांची इन्स्टाग्राम रील तयार करावी. रील प्रसिद्ध करताना #SaveSoilSaveWater हा अधिकृत हॅशटॅग वापरणे तसेच मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकृत खात्याला टॅग करणे बंधनकारक आहे.


स्पर्धेतील जिल्हास्तरीय विजेत्यांना ‘महाराष्ट्र युवा जलदूत’ या नावाने पुरस्कार देण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांकासाठी २५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी १५ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी १० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. २१ ऑगस्ट रोजी या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.


१ लाख रील्सचे उद्दिष्ट


जिल्ह्यातील महाविद्यालये, शाळा, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्रसेना तसेच सामाजिक माध्यमांवरील प्रभावक, इन्स्टाग्राम निर्माते आणि यूट्यूबर्स यांच्याशी समन्वय साधून या उपक्रमात युवकांचा अधिकाधिक सहभागी व्हावे.


‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’


२१ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरावर ३ किलोमीटरच्या ‘महा वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले असून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ हे या उपक्रमाचे मुख्य घोषवाक्य असून #MahaWalkathon आणि #WalkForWater या हॅशटॅगचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


मृद व जलसंधारण विभागाच्या या नाविन्यपूर्ण स्पर्धेचे नियम, नोंदणीसाठीचा क्यूआर कोड तसेच https://register.mahaevent.co.in/ या संकेतस्थळाच्या माध्यमातून नोंदणी करावी, असे आवाहन मृद व जलसंधारण अधिकारी श्याम फेरवाणी यांनी केले आहे.

0 Response to "जिल्ह्यात ‘महाराष्ट्र युवा जलदूत’ होण्याची संधी मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धेचे आयोजन १५ ते ३० वयोगटातील युवक-युवतींना सहभागी होता येणार"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article