जलसंधारण दिन' (२१ ऑगस्ट) निमित्त आयोजित "महा वॉकेथॉन फॉर वॉटर" व इतर उपक्रमांमध्ये सर्व अधिकारी, कर्मचारी व कुटुंबीयांच्या सक्रिय सहभागाबाबत.
साप्ताहिक सागर आदित्य
जिल्ह्यातील सर्व शासकीय / निमशासकीय यंत्रणा प्रमुख,
सर्व विभाग प्रमुख,/ सर्व नागरिकांना
विषय: 'जलसंधारण दिन' (२१ ऑगस्ट) निमित्त आयोजित "महा वॉकेथॉन फॉर वॉटर" व इतर उपक्रमांमध्ये सर्व अधिकारी, कर्मचारी व कुटुंबीयांच्या सक्रिय सहभागाबाबत.
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट रोजी संपूर्ण राज्यात 'जलसंधारण दिन' साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने जलसंधारणाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रमुख उपक्रम:
महा वॉकेथॉन फॉर वॉटर: २१ ऑगस्ट रोजी सकाळी जिल्ह्यामध्ये वॉकेथॉनचे आयोजन.
रील्स स्पर्धा: जलसंवर्धनाचा संदेश देणाऱ्या विशेष सोशल मीडिया रील्स स्पर्धा (विशेषतः युवक व कुटुंबीयांसाठी).
नोंदणी: शासकीय जाहिराती व समाजमाध्यमांवर उपलब्ध अधिकृत QR कोड स्कॅन करून सहभाग नोंदवणे.
निर्देश व आवाहन:
१. जिल्ह्यातील सर्व यंत्रणा प्रमुखांनी आपल्या अखत्यारीतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना या मोहिमेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे.
२. "पाणी अडवा, पाणी जिरवा" हा संदेश घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी अधिकारी/कर्मचाऱ्यांसोबत त्यांच्या कुटुंबीयांनीही 'जलदूत' बनून या महा-वॉकेथॉनमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
३. विभागातील तरुण पिढीने जलजागृतीविषयक रील्स स्पर्धेत सक्रीय सहभाग नोंदवावा यासाठी विशेष प्रयत्न करावेत.
'जलसमृद्ध व हिरवागार महाराष्ट्र' घडवण्यासाठी आपल्या सर्वांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. तरी सर्व विभागांनी वेळेत उपस्थित राहून हा उपक्रम यशस्वी करावा.
0 Response to "जलसंधारण दिन' (२१ ऑगस्ट) निमित्त आयोजित "महा वॉकेथॉन फॉर वॉटर" व इतर उपक्रमांमध्ये सर्व अधिकारी, कर्मचारी व कुटुंबीयांच्या सक्रिय सहभागाबाबत."
Post a Comment